Tarun Bharat

परिचारीकेची दोन लाखांची फसवणूक

प्रतिनिधी / वाई :

वाई येथील प्राध्यापक कॉलनीत राहणाऱ्या परिचारिकेच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून क्रेडिट कार्डचा नंबर विचारून 1 लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

वाई पोलिसात शोभा दीपक बहाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या पुण्यातील कोंढव्यात एका हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहेत. त्यांना दि.18 फेब्रुवारी 2022 रोजी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान फोन आला. हेल्पलाईन वरून बोलत आहे असा विश्वास दाखवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या क्रेडिट कार्डचा नंबर मागवून घेतला. अन क्षणात त्यांच्या एसबीआय बँक खात्यातून सुमारे 1 लाख 92 हजार 33 रुपये काढून घेतले असून याचा तपास महिला पोलीस हवालदार शिरतोडे या करत आहेत.

Related Stories

फलटण तालुक्यात दोन बालिकांवर बलात्कार

datta jadhav

खूनाची धमकी देणाऱया खंडणीबहाद्दरास अटक

Patil_p

सातारा : दुचाकी वाहनांसाठी एमएच 11- सी झेड मालिका सुरू होणार

datta jadhav

शिंगणापूर यात्रा निधीबाबत, कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी यांनी केला पाठपुरावा

Patil_p

SATARA-कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरूच, कोयनेचा पाणीसाठा ३१.३२ टीएमसी

Rahul Gadkar

सातारा : अखेर वारणानगर ‘कोरोनामुक्त’, ते पाच ही अहवाल निगेटिव्ह

Archana Banage