Tarun Bharat

परिवहन कर्मचाऱयांच्या संपामुळे खानापूर आगारात शुकशुकाट

प्रतिनिधी/ खानापूर

कर्नाटक राज्यातील परिवहन विभागाच्या कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून संप सुरू केला आहे. या संपाचा परिणाम खानापूर बसस्थानक व आगारावरही झाला आहे. गेल्या दोन दिवसात खानापूर बसस्थानकातून एकही बस इतर कुठेही धावू शकली नाही. तसेच बाहेरील बसही येऊ शकली नाही. यामुळे ऐरवी गजबजलेल्या बसस्थानक आणि बसआगार आवारात एकप्रकारची निरव शांतता निर्माण झाली असून पोलीस खात्याकडूनच बसस्थानक आणि आगाराचे रक्षण करण्याची वेळ आली आहे. गेले दोन दिवस याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

खानापूर आगारातून दररोज जवळपास 50 बससेवा सुरू असतात. तसेच कर्नाटक राज्य व गोव्यातील विविध भागातून खानापूर बसस्थानकाला बसेसची ये-जा सुरू असते. दिवसाला जवळपास 100 हून अधिक बस खानापूर बसस्थानकावरुन ये-जा करत असतात. पण गेल्या दोन दिवसापासून परिवहन कर्मचाऱयांच्या संपामुळे खानापूर आगारातील एकही बस बाहेरगावी गेली नाही. तसेच दुसऱया आगाराची एकही बस खानापूर बसस्थानकावर आली नाही. याचा विपरीत परिणाम तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनजीवनावर झाला आहे.

दरवर्षी तालुक्यातील विविध मार्गावर सुरू असलेल्या सर्व बससेवा बंद असल्याने ग्रामीण जनतेला खानापूरला येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. केवळ खासगी प्रवासी वाहनेच सुरू आहेत. पण खासगी प्रवासी वाहने ठराविक मार्गावरच फिरत असतात. यामुळे ज्या भागात खासगी वाहने जात नाहीत. त्या भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यशासनाने परिवहन कर्मचाऱयांच्या मागण्या त्वरित पूर्ण करून त्यांच्या संपामुळे गेल्या दोन दिवसापासून बंद पडलेल्या बससेवा पूर्ववत कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Related Stories

मनपाच्या शिल्लकी अर्थसंकल्पाला जिल्हाधिकाऱयांकडून मंजुरी

Patil_p

बॉक्साईट रोडवर बर्निंग कारचा थरार

Amit Kulkarni

घटप्रभाजवळ 42 लाख रुपये जप्त

Amit Kulkarni

पारायणात माउलींच्या अश्वांचा रिंगण सोहळा

Amit Kulkarni

कुद्रेमनीतील नागरिकांची आरोग्य तपासणी

Patil_p

खानापूर-पारवाड वस्ती बस सुरू करा

Omkar B
error: Content is protected !!