Tarun Bharat

परिवहन कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा अद्याप कायम

जेलभरो आंदोलनाला थंडा प्रतिसाद : तेरा दिवस उलटले, प्रवाशांचे हाल : परिवहन मंडळाला फटका ; कर्मचारी मागण्यांवर ठाम

प्रतिनिधी / बेळगाव

सहावा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी परिवहनच्या कर्मचाऱयांनी मागील तेरा दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे बससेवा ठप्प झाली असून प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. याचा फायदा खासगी वाहतूकदार उठवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे परिवहन मंडळ व पोलीस प्रशासनाने अशांना समज देऊन कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासीवर्गातून होत आहे.

परिवहन कर्मचारी संघाने सोमवारपर्यंत डेडलाईन दिली होती. चर्चेसाठी पुढाकार न घेतल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्य सरकार चर्चेला निरुत्साही दिसत असल्याने परिवहन मंडळ कर्मचाऱयांच्या संपाचा तिढा अद्याप कायम आहे. सोमवारी चौदाव्या दिवशी कर्मचाऱयांनी संप मागे न घेतल्याने संप आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची हेळसांड सुरू आहे. शिवाय मागील चौदा दिवसांपासून बससेवा ठप्प असल्याने दररोज लाखो रुपयांचा फटका बसत आहे. परिवहन मंडळ अधिकाऱयांच्या कठोर उपाययोजनांमुळे 30 टक्के बस रस्त्यावर धावत असल्या तरी अद्याप बससेवा सुरळीत सुरू झाली नाही.

परिवहन कर्मचाऱयांनी सहावा वेतन आयोग लागू करण्याबरोबर इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. दरम्यान, राज्य सरकारने कर्मचाऱयांच्या मागण्यांना नकार दर्शविला आहे. या संपामुळे परिवहनला 170 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शिवाय संप काळात परिवहनच्या 59 हून अधिक बसेसवर दगडफेक झाली आहे. त्यामुळे परिवहनचे मोठे नुकसान झाले आहे.

सोमवारी बेळगाव बसस्थानकातून बागलकोट, चिकोडी, खानापूर, सुळेभावी, निपाणी आदी भागांकडे काही मोजक्मया बस धावल्या. मात्र, अद्याप बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली नसल्याने खासगी वाहनांवरच अवलंबून राहावे लागत आहे. दररोज 30-35 बस धावत असल्या तरी लांब पल्ल्यासाठी अद्याप बससेवा सुरू झाली नाही. परिवहनच्या कर्मचाऱयांनी आपल्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, परिवहन व राज्य सरकार आपापल्यापरीने संप मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, अद्याप त्याला यश आले नाही. त्यामुळे बससेवा कधी सुरळीत सुरू होणार या चिंतेत राज्यातील प्रवासीवर्ग वावरत आहे.

जेलभरो आंदोलनाला प्रतिसाद नाही

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या तेरा दिवसांपासून परिवहन कर्मचाऱयांचा संप सुरू आहे. सरकारने यापूर्वीही त्यांच्या संपूर्ण मागण्यांना नकार दर्शविला आहे. त्यामुळे संप सुरूच आहे. दरम्यान, परिवहनच्या कर्मचारी संघटनेने कठोर भूमिका घेत सोमवारी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, सोमवारी बेळगाव बसस्थानकातून 40 हून अधिक बस विविध मार्गांवर धावल्या. शिवाय आणखी काही कर्मचारी बससेवेत हजर झाले होते. त्यामुळे जेलभरो आंदोलनाला दिवसभरात प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

मध्यवर्ती बसस्थानकातून निपाणी, हुक्केरी, चिकोडी, धारवाड, हुबळी आदी भागात बसेस धावल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. त्यामुळे सोमवारच्या जेलभरो आंदोलनाला जिल्हय़ात थंडा प्रतिसाद पाहायला मिळाला.

Related Stories

आर.के.लक्ष्मण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राजकीय व्यंगचित्रकार

Patil_p

लग्नाला पाहुणे म्हणून आले अन् प्रेझेंटची पर्स पळविली

Amit Kulkarni

मजगाव येथे पोलिसांचे पथसंचलन

Patil_p

खानापुरात शिवप्रताप दिन साजरा

Patil_p

बेकायदेशीररित्या कासवांची विक्री करणाऱयाला अटक

Patil_p

हिंडलगा पंपिंग स्टेशनचा विकास आवश्यक

Amit Kulkarni