Tarun Bharat

परिवहन महामंडळाच्या ताफ्यात जुन्या बस

नादुरुस्त होणाऱया बसच्या प्रमाणात वाढ : दुरुस्ती डोईजड, परिवहन अडचणीत, नवीन बसची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अधिक काळ प्रवास केलेल्या जुन्या बसची संख्या  40 टक्क्मयांहून अधिक आहे. बेळगाव आणि चिकोडी विभागातील 1340 बसपैकी तब्बल 604 बस जुन्या झाल्या आहेत. मात्र प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी असल्याने त्या विविध मार्गावर धावत आहेत. त्यामुळे नादुरुस्त होणाऱया बसच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय बसच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे.

बेळगाव आणि चिकोडी विभागातील परिवहनच्या ताफ्यात असलेल्या जुन्या बस प्रवाशांना डोकेदुखीच्या ठरत आहेत. मात्र परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडल्याने नाईलाजास्तव जुन्याच बस दुरुस्त करून चालविण्याची वेळ आली आहे. नियमानुसार 9.50 लाख किलोमीटर अंतर पूर्ण झालेल्या बस वाहतुकीसाठी वापरल्या जात नाहीत. मात्र बसची संख्या कमी असल्याने बेळगाव आणि चिकोडी विभागात 9.50 लाख किलोमीटरहून अधिक प्रवास केलेल्या बस सेवेत आहेत. तर काही बसचा प्रवास 12 ते 13 लाख किलो मीटरपर्यंत झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

53 लाख लोकसंख्या असलेला बेळगाव जिल्हा राज्यात दुसऱया क्रमांकावर आहे. दरम्यान, बेळगाव जिल्हय़ाला महाराष्ट्र आणि गोव्या राज्यांच्या सीमा जोडल्या गेल्याने आंतरराज्य प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. विशेषतः बेळगाव विभागाचा महसूल हा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात धावणाऱया बसवर अवलंबून आहे.

प्रवाशांची गैरसोय

जुन्या बस विविध मार्गावर धावत असल्याने नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. तर काही वेळेला भर रस्त्यावर बस बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. काही वेळेला नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना ऊन, पावसाचा सामना करावा लागतो.

नवीन बस नाहीत

कोरोनामुळे आधीच आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या परिवहनला नवीन बस उपलब्ध करणे शक्मय नाही. मागील काही महिन्यांपासून परिवहनच्या ताफ्यात एकही नवीन बस दाखल झाली नाही. जुन्याच बस दुरुस्त करून प्रवासी वाहतूक सुरू आहे.

नवीन बस उपलब्धतेनंतर जुन्या बस बाहेर…

कोरोनामुळे परिवहनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच नवीन बस देखील उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे काही जुन्या बसवरच प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र येत्या काळात नवीन बस उपलब्ध होणार आहे. त्यानंतर जुन्या बस बाहेर काढल्या जातील.

– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण, अधिकारी)

बसची आकडेवारी

जिल्हय़ातील एकूण बस संख्या1340
चिकोडी विभाग640
बेळगाव विभाग700
जुन्या बसची संख्या604
बेळगाव विभाग300
चिकोडी विभाग304

Related Stories

बेळगावमध्ये शेतकऱयांचे आंदोलन

Amit Kulkarni

मजगाव येथील युवकाचा भीषण खून

Omkar B

टेलिव्हिजन टेड युनियनच्या कर्नाटक अध्यक्षपदी अभिनेता राज के. पुरोहित यांची निवड

Patil_p

1 नोव्हेंबर काळय़ादिनी लाक्षणिक उपोषण

Amit Kulkarni

भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात आता दोन वाघ दाखल

Omkar B

सांडपाणी प्रकल्पासाठी पुन्हा शेतकऱयांच्या पिकावर बुल्डोजर

Tousif Mujawar