Tarun Bharat

परीक्षा घेण्यास मुख्याध्यापक संघटनेचा पूर्ण पाठिंबा

Advertisements

सर्व प्रकारची सेवा मोफत देण्याचीही तयारी

प्रतिनिधी / पणजी

दहावीची पूर्ण परीक्षा व बारावीच्या शिल्लक तीन पेपर्सची परीक्षा घेण्याच्या गोवा बोर्डाच्या निर्णयास गोवा मुख्याध्यापक संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शवला असून त्यासाठी सर्व प्रकारची आवश्यक ती सेवा पूर्णपणे मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे.

संघटनेचे अध्यक्ष मारियानो वालादारीस यांनी तशा आशयाचे पत्र गोवा बोर्डाच्या सचिवांना पाठवले असून त्यात वरील महिती देण्यात आली आहे. संघटनेची ऑनलाईन बैठक घेऊन त्यात दहावी परीक्षेबाबत चर्चा करण्यात आली. परीक्षा घेण्याचा गोवा बोर्डाचा तसेच राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले आणि त्याचे समर्थन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शाळांमध्येच परीक्षा घ्यावी

शाळेतील दहावीच्या मुलांची संख्या पुरेशी असेल तर त्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्याची व्यवस्था करावी. जर मुलांची संख्या जास्त असेल तर जवळच्या शाळा उपकेंद्र म्हणून घेऊन वापर करण्यात यावा. उपकेंद्रातील पर्यवेक्षकांची देवाणघेवाण करावी. उपकेंद्र असलेल्या शाळाप्रमुखांकडे प्रश्नपत्रिका, स्टेशनरी साहित्य आणण्याची तसेच उत्तरपत्रिका घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवावी, अशी सूचना संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

मुलांना पोहोचवण्याची जबाबदारी पालकांची

परीक्षा उपकेंद्र जर जवळ असेल तर पालकांनी मुलांना तेथे पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावी. गोवा सीमेपलिकडून अर्थात महाराष्ट्र, कर्नाटक सीमेलगतच्या गावातून येणाऱया विद्यार्थ्यांसाठी वेगळे स्वतंत्र परीक्षा केंद्र देण्यात यावे.

शिक्षणात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी देण्यासाठी अनुमती मिळावी आणि कोविड – 19 ची सर्व मार्गदर्शक तत्वे पाळून ती देण्यात यावी असेही संघटनेने बोर्डाला पत्रातून कळविले आहे.

बोर्डाला कोणतीही सेवा मोफत देण्याची तयारी संघटनेतर्फे गोवा बोर्डाला परीक्षेसाठी आवश्यक असलेली कोणतीही सेवा देण्याची तयारी दर्शविण्यात आली असून ती पूर्णपणे मोफत असेल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असेही बोर्डाला पाठविण्यात आलेल्या पत्रातून संघटनेने स्पष्ट केले आहे.

Related Stories

डॉ.भाटीकर यांचे कार्य, हीच विजयाची खात्री

Amit Kulkarni

गिरीश चोडणकर यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Amit Kulkarni

भाजपतर्फे राजमाता विजयाराचे सिंधीया यांची जयंती साजरी

Omkar B

मडकईतील नागरिकांची पाणी विभागावर धडक

Amit Kulkarni

गोवा राखून ठेवण्यासाठी युवा पिढीने आवाज उठविण्याची गरज

Amit Kulkarni

पणजी मार्केट आजपासून खुले

Omkar B
error: Content is protected !!