Tarun Bharat

‘परीक्षेला हवे तर बसा नाही तर सोडा’

आरसीयूच्या कुलसचिवांच्या बेजबाबदार उत्तरामुळे विद्यार्थी-पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड उलथापालथी घडल्याने विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचले आहे. त्यातच 27 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले आहेत. याबाबत विद्यापीठाच्या कुलसचिवांकडे विचारणा करता विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याऐवजी त्यांना अत्यंत बेजबाबदार उत्तरे देऊन ‘परीक्षेला हवे तर बसा नाही तर सोडा’, असे सांगण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राणी चन्नम्मा विद्यापीठाने 27 एप्रिलपासून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. पदवीच्या पहिल्या, तिसऱया, पाचव्या सेमिस्टर व पदव्युत्तरच्या पहिल्या व तिसऱया सेमिस्टरच्या परीक्षा 27 एप्रिलपासून होणार आहोत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. परीक्षेला न जावे तर शैक्षणिक वर्ष बुडते व परीक्षेला जावे तर आरोग्य धोक्मयात येते, अशा कोंडीत विद्यार्थी सापडले आहेत.

याबाबत एका विद्यार्थिनीने आरसीयूचे कुलसचिव (परीक्षा विभाग) हुरकडली यांच्याकडे फोनवरून विचारणा करता त्यांनी त्या विद्यार्थिनीला धीर देण्याऐवजी ‘पाहिजे तर परीक्षेला बस नाही तर पुढच्या वषी बस, लाखो विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत. तुला काय फरक पडणार आहे? तुला काय प्रॉब्लेम आहे? हवे तर वरपर्यंत शिक्षणमंत्र्यांशी बोल’, अशी उर्मट उत्तरे दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचे मनोधैर्य ढळणार नाही याकडे लक्ष द्या, असे सरकार आणि शिक्षणमंत्री गतवषी कोरोना सुरू झाला तेव्हापासून सांगत आहेत. परंतु, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मात्र अत्यंत बेजबाबदार उत्तरे मिळत आहेत. अशा उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.

परीक्षेबाबत सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी सरकारने चर्चा केली होती. परिवहनचा संप मिटल्यानंतर परीक्षा घ्याव्यात, असे त्यावेळी ठरले होते. मात्र, त्यावेळी कोरोनाचे संकट इतके तीव्र होईल, याची कल्पना कोणालाही नव्हती. आता कोरोना वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा चिंता पसरली आहे. कर्फ्यूमुळे परगावांतील विद्यार्थी परीक्षेला येणे कठीण होणार आहे. परीक्षा सुरळीतपणे व्हायच्या असतील तर विद्यार्थ्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढविण्याची गरज असताना अशा पद्धतीची उत्तरे मिळणे हे केवळ दुर्दैवी आहे.

दरम्यान, ‘तरुण भारत’ प्रतिनिधींनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामचंद्रगौडा यांच्याशी संपर्क साधता त्यांनीसुद्धा पूर्ण ऐकून न घेता फोन कट केला आणि नंतर परत परत फोन करूनही प्रतिसाद दिला नाही. ‘विद्यार्थ्यांना रेकॉर्डिंग आणि ऑडिओ क्लीप करण्यापलीकडे काम नाही का?’ इतके सांगून काही बोलण्यापूर्वीच त्यांनी फोन कट केला. प्रसारमाध्यमे पूर्ण माहिती घेण्यासाठी संपर्क साधत असताना एकूणच विद्यापीठातून अशा पद्धतीची उत्तरे मिळणे आणि बेपर्वाईचे वर्तन यामुळे विद्यापीठाचा भोंगळ कारभार सामोरा आला आहे.  दरम्यान, 27 एप्रिलपासून होणाऱया राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकणार नाहीत/गैरहजर राहतील, त्यांच्याकरिता नंतर विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, असा आदेश रविवारी काढला, पण त्यावर तारीख शनिवारची आहे.

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा खाक्मया

विद्यार्थी, पालक आणि माध्यमांनासुद्धा योग्य ती माहिती न देणे हा राणी चन्नम्मा विद्यापीठाचा खाक्मया बनला आहे. शक्मय नसेल तर परीक्षेला बसू नका. पुढच्या वषी बसा, नाही तर शिक्षणमंत्र्यांशी बोला, असे अरेरावीने सांगणाऱया कुलसचिवांनी परीक्षा पुढे ढकलल्याचे परिपत्रक प्रसिद्धीस पाठविले आहे आणि आश्चर्य म्हणजे त्यावर शनिवार दि. 24 एप्रिल अशी तारीख आहे. हेच कुलसचिव विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नांना परीक्षा लांबणीवर टाकणे आपल्या हातात नाही तर तो सरकारचा निर्णय असे सांगताना दिसतात. एकूण या सर्वच बाबतीत विद्यापीठाकडून पूर्ण माहिती घेऊन ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी तरुण भारतने रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले. परंतु राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलसचिव आणि कुलगुरू या दोघांनीही कोणताच प्रतिसाद दिला नाही.

परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकारशी चर्चा करणार

परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता  परीक्षेला सामोरे कसे जायचे या विवंचनेत विद्यार्थी आहेत. मात्र, विद्यापीठाच्या कुलसचिवांनी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याऐवजी अशी उत्तरे देणे हे दुर्दैवी आहे. आपण या संदर्भात कुलसचिवांशी बोललो असून परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकारशी चर्चा केली जाईल, असे रोहित उमनाबादीमठ या अभाविपच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

बिजगर्णी येथे दोन गटात हाणामारी

Patil_p

कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या वाढतीच

Amit Kulkarni

किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात भातकापणीला सुरूवात

Amit Kulkarni

बेळगावमध्ये आजपासून राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

Amit Kulkarni

तिनईकर हल्लाप्रकरणातील एकाला जामीन

Amit Kulkarni