ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरात लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे. तर सरकारकडून कोरोना चाचण्यांचे प्रमाण देखील वाढवण्यात आले आहे. असे असले तरी रुग्ण वाढीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. त्यातच आता महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील केले आहे.