Tarun Bharat

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात नागरी सत्कार

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी

पर्यटन विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हय़ाला 31 कोटींचा निधी देणाऱया राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. शिवसैनिकांनी या संदर्भात निर्धार केला असून लवकरच या सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

क्षीरसागर यांनी माहिती देताना सांगितले की : कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास येत आहे. रोज हजारो पर्यटक भेट देत असतात. पर्यटकांना कोल्हापूरची ऐतिहासिक माहिती व्हावी, पुरातन वास्तूंचे संवर्धन व्हावे, यासाठी विविध कामांना निधी मिळावा म्हणून राज्याच्या पर्यटन विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यास यश मिळत आहे. पर्यटन, व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाच्या माध्यमातून जिह्यातील पर्यटन वृद्धीसाठी 31 कोटी 31 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रंकाळा तलाव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन व जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, शहरात मल्टीपर्पज स्पोटर्स ग्राउं। शहरात विविध ठिकाणी ओपन जिम, विचारे माळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी व ग्रंथालय, कळंबा तलावाचे सुशोभिकरण व संवर्धन, ऐतिहासिक पन्हाळागड येथे लाईट शो, साऊंड शो, लेजर शो व इतर अनुषंगिक कामे, शाहूवाडी पावनखिंड येथे समाधीस्थळांचा विकास, अस्तित्वातील दगडी बांधकामाची डागडुजी, पर्यटकांसाठी प्रसाधनगृह, निढोरी (ता. कागल) गावातील महादेव मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक सुधारणा, कागल येथील ग्राम दैवत विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील रस्ता सुधारणा व पेव्हिंग ब्लॉक बसविणे, पिराचीवाडी (ता. कागल) महादेव मंदिर व हनुमान मंदिर परिसरात महिला व पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र भक्त निवास उभारणी, देवरवाडीतील (ता. चंदगड) श्री वैजनाथ देवस्थान मंदिरासमोर सभामंडप बांधणे, सुरपली (ता. कागल) गावात तलाव परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रिटेनिंग वॉल उभारणे, स्वागत कमान उभारणे व महादेव मंदिर परिसरात सुशोभिकरण, मंदिर परिसराला जोडणारे रस्ते, राऊंड गटर आणि सांस्कृतिक हॉल बांधणे आदी कामे होणार आहेत.

Related Stories

फोन टॅपिंग प्रकरण : पुणे पोलीस आज नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार

datta jadhav

यात्रा करा नाहीतर…, खासदार राऊतांचे जन आशीर्वाद यात्रेवर टिकास्त्र

Archana Banage

”भाजपचे सरकार आहे तिथे कोरोना पळून गेला कारण…”

Archana Banage

राहुल गांधी यांच्या अटकेचे सांगलीत पडसाद

Archana Banage

सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्र कणेरीमठ येथे राष्ट्रीय पोषण माह साजरा

Archana Banage

मला रोखण्यासाठीच हे कारस्थान; ED च्या समन्सनंतर राऊतांचं ट्विट

datta jadhav