Tarun Bharat

पर्यटनाच्या संर्वधनासाठी पर्यटन धोरण तयार करणार

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

 पर्यटन हा गोव्यातील महत्वाचा उद्योग असून मोठय़ा प्रमाणात गोवा सरकारला महसूल यातून मिळत आहे. त्यामुळे पर्यटनाच्या संर्वधनासाठी सांस्कृतिक वैद्यकीय व ईको टुरिझम अंतर्गत पर्यटनाला चालन दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोवा माईल्सतर्पे आयोजित केलेल्या टॅव्हल माईल्स या मासिकाच्या उद्घाटनाला ते प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

 जरी या वर्षी राज्यातील पर्यटन हंगाम काही प्रमाणात संथ असला तरी आपण पर्यटन क्षेत्राशी निघडीत असलेल्या सर्व घटकांनी एकत्र येऊत प्रयत्न केल्यास गोव्यातील पर्यटनाला मोटय़ा प्रमाणात चालना मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

गोवा माईसकडून उत्कृष्ट वाहतूक सेवा पुरविली जात आहे. या संस्थेने प्रकाशित केलेला हा ट्रव्हला माईल्स मासिक पर्यटकांना खूप लाभदायक ठरणार आहे. यामध्ये हॉटेल्स, मंदिरे तसेच अनेक पर्यटन स्थळांची माहिती आहे. यामुळे  गोव्यातील सर्व पर्यटन स्थळे प्रसिद्ध होणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ही चांगली गोष्ट आहे. यामुळे गोव्याकडे अनेक पर्यटक वळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणले.

गोव्यात जास्तीत जास्त पर्यटक यावेत यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. गोवा माईल्स बंद करावी यासाठी अनेक दबाव आले होते पण आम्ही कुठल्याच दबावाखाली न येता ही सेवा सुरुच ठेवली आहे. गोवा माईल्स सेवेत 1600 पेक्षा अधिक टॅक्सी कार्यरत आहे. मागिल 16 महिन्याच्या कार्यकाळात या टॅक्सकडून 4 लाखापेक्षा जास्त भाडे मारण्यात आले. स्थानिक सुद्धा या सेवत सहभागी होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात लवकरच पर्यटन धोरण

राज्यात लवकरच पर्यटन धोरण तयार केले जाणार आहे. पर्यटन क्षेत्राशी निघडीत असलेल्या सर्व घटकांना यात विश्वासात घेतले जाणार आहे. राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने हे धोरण गरजेचे आहे. गोव्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट  देण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांना आमंत्रित केले जणार आहे तसेच सर्व क्षेत्रात पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी भर दिली जणार आहे, असे ही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत गावा माईल्सचे संचालक पराशर पै खोत, पूजा पै खोत, सूनील टंडन, उत्कृर्ष दबाडे व अन्य उपस्थित हेते.

Related Stories

मडकईतील पाणी समस्येवर तोडगा काढणार

Patil_p

गोव्यात मंगळवारी कोरोनाचे 136 बाधित

GAURESH SATTARKAR

पेडणे तालुक्यात शिमगोत्सवाला सुरुवात

Patil_p

राज्य निवडणूक आयुक्त सरकारचे बाहुले

Amit Kulkarni

फणस, नारळाला जिल्हा उत्पादने म्हणून मान्यता

Omkar B

स्मार्ट सिटीत 350 कोटीच्या महाघोटाळ्याची शक्यता

Patil_p
error: Content is protected !!