Tarun Bharat

पर्यटन महामंडळाला दोन कोटींचा फटका!

कोकण विभागीय अधिकारी संजय ढेकणे यांची माहिती

प्रतिनिधी/ रत्नागिरी

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जिल्हा पर्यटकांनी गजबजलेला असतो. यंदा मात्र कोरोनामुळे पर्यटन व्यवसायही ‘लॉकडाऊन’ झाला.  या महामारीचा फटका संपूर्ण वर्षभर बसण्याची शक्यता असून त्यामुळे कोकणला मोठा आर्थिक फटका बसणारा आहे. केवळ दोन महिन्यातच पर्यटन महामंडळाला तब्बल 2 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी संजय ढेकणे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

कोरोनामुळे संपूर्ण देश आर्थिक टंचाईत सापडला आहे, पर्यटन क्षेत्रही त्याला अपवाद नाही. एमटीडीसीबरोबरच इतर सर्व लॉज, हॉटेलधारक विशेषत: गणपतीपुळेला मोठा फटका बसला आहे. जिह्याचा विचार करता सर्वाधिक उत्पन्न गणपतीपुळे पर्यटन क्षेत्रातून मिळते. यंदा सर्वात मोठे नुकसानही तेथेच झाले आहे.

गतवर्षी एप्रिल, मे या दोन महिन्यांत सव्वा कोटीचे उत्पन्न प्राप्त झाले होते. हे दोन महिने वगळता वर्षभरातील इतर पर्यटन हंगाम वायाच गेला.  हिवाळय़ात व  नाताळच्या सुट्टीला येणारे पर्यटक ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे कोकणात फिरकले नाहीत. यंदा एप्रिल-मे महिन्याचे 50 टक्के ऍडव्हान्स बुकींग झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे बुकींग रद्द झाले. अजून किती दिवस कोरोनाचे संकट कायम राहील याबाबत कोणीच सांगू शकत नाही. दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत असून ही लढाई जिकण्याला सध्या प्राधान्य आहे. 2020 हे संपूर्ण वर्षच स्वत:ची काळजी घेण्यातच जाईल अशी शक्यता असल्याने पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान होणार असल्याचे ढेकणे यांनी सांगितले.

यावर्षी मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल होणार म्हणून एमटीडीसीने अनेक उपक्रम हाती घेतले होते. यातून सुमारे 2 कोटीचे उत्पन्न महामंडळाला अपेक्षित होते, मात्र पर्यटन क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाल्याने हे उपक्रम कागदावरच राहिले. कोरानाचा प्रार्दुभाव पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत नव्याने पर्यटन उद्योग सुरु होणे कठीण आहे.

पर्यटन व्यवसायाचा तोटा 10 कोटींच्या घरात कोकणातील केवळ पर्यटन महामंडळाला झालेला तोटा 2 कोटींच्या घरात असल्याने एकूणच पर्यटन उद्योगाचा तोटा 10 कोटीपेक्षाही अधिक असल्याचा अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. महामंडळाच्या रिर्सोर्ट व नोंदणीकृत उपक्रमांमध्ये नोंद न झालेले हजारो पर्यटक दरवर्षी कोकणात येत असतात. जिल्हय़ातील अनेक  छोटय़ा-मोठय़ा हॉटेल्स, लॉजेसमध्ये त्यांचे वास्तव्य असते. शिवाय पर्यटनस्थळ परिसरात नारळ पाणी, घरगुती जेवण, सरबत, कोकणी मेवा यासारखे अनेक छोटे मोठे व्यवसाय पर्यटकांवरच चालत असतात. शिवाय वाहतूक व्यवस्था, फोटोग्राफी, धार्मिक स्थळांचे उत्पन्न आदी अनेक क्षेत्र यावर अवलंबून असल्याने हा फटका

Related Stories

वीज पुरवठ्याअभावी उमरे प्रादेशिक नळपाणी योजना फेल, दहा गावांना पाणी पाणी करण्याची वेळ

Archana Banage

सावंतवाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी रवींद्र कणसे

NIKHIL_N

चिपळुणमध्ये वाळूमाफियांचा थैमान, महसूल विभागाने बुडवल्या ९ बोटी

Archana Banage

नेमळे ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवस्थानचा जत्रौत्सव १६ नोव्हेंबरला

Anuja Kudatarkar

जागतिक योगदिनी ‘योगी पपेटबाबा’ची एन्ट्री

NIKHIL_N

पॅरोलवरुन फरार रफिक शेख 7 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

Patil_p