Tarun Bharat

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम

प्रतिनिधी / बेळगाव :

रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ व खादी आणि ग्रामोद्योग विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने क्लबतर्फे पर्यावरणस्नेही श्रीमूर्तींची विक्री करण्यात येणार असून खरेदी करणाऱया भक्तांना खादी ग्रामोद्योगतर्फे खरेदीमध्ये सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष इरफान शेख अली यांनी दिली.

क्लबतर्फे सी रॉक हॉटेलमध्ये बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. व्यासपीठावर सचिव शशिकांत सूर्यवंशी, अभयसिंह ठाकुर, इव्हेंट चेअरमन राम कोकणे, खादी ग्रामोद्योगचे हुबळी विभागाचे संचालक एस. एस. तांबे व खानापूरच्या कुंभारी संस्थेचे प्राचार्य प्रभाकर उपस्थित होते.

इरफान शेख अली म्हणाले, रोटरी माणुसकीसाठी कार्य करते. गतवषी पूरपरिस्थितीमध्ये रोटरीने आपदग्रस्तांना मदत केली. तर यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभारांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने पर्यावरणस्नेही गणपती ही संकल्पना राबविण्यात येत आहे. रोटरीने यापूर्वी 1 हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. जयपूर फूट शिबिर आयोजित केले आहे. शिवाय कर्करोग तपासणी शिबिर, डायलेसिस युनिट हे क्लबचे उपक्रम आहेत. यंदा पर्यावरणस्नेही गणेशमूर्तींचा प्रसार करून खानापूरच्या कुंभारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

गणेश मूर्तीबरोबर एक रोपही देण्यात येणार

या उपक्रमाला खादी ग्रामोद्योगचे सहकार्य लाभले आहे. 800 ते 1800 अशा दरामध्ये मूर्ती उपलब्ध आहेत. मूर्तीबरोबर एक रोपही देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा निधी कोरोना योद्धय़ांसाठी आणि शाळांना पाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

एस. एस. तांबे यांनी खादी ग्रामोद्योगअंतर्गत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्फूर्ती या उपक्रमांतर्गत अनुदानही दिले जात आहे. मातीपासून दागिने बनविण्यात येत आहेत. हुदली येथे खादीचे कापड आणि अन्य उत्पादने तयार केली जात आहेत. रोटरीच्या माध्यमातून जे भाविक श्रीमूर्ती खरेदी करतील, त्यांना खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे त्यांच्या खरेदीवर सवलत देण्यात येईल, असे सांगितले. राम कोकणे यांनी व्होकल टू लोकल या माध्यमातून मूर्तिकारांना आत्मनिर्भर करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे सांगितले.

स्वागत व सूत्रसंचालन सचिव शशिकांत सूर्यवंशी यांनी केले. अभयसिंह ठाकुर यांनी आभार मानले.

Related Stories

जायचे होते कोप्पळला… पोहोचले बेळगावात!

Amit Kulkarni

बाजारात रानमेवा दाखल

Amit Kulkarni

हिडकल-लोकूरमध्ये रेशनचा तांदूळसाठा जप्त

Amit Kulkarni

श्री सरस्वती को-ऑप. सोसायटीची सभा खेळीमेळीत

Omkar B

ऊस बिलासाठी शेतकऱ्याने स्वतःच खोदली स्वतःची समाधी

Tousif Mujawar

देवस्थान मंडळाच्या वतीने पावसासाठी गाऱहाणे

Amit Kulkarni