Tarun Bharat

पर्यावरणाचा सर्वच क्षेत्रांशी संबंध – रजनीश जोशी

विदयापीठातर्फे आयोजित ‘जागर पत्रकारितेचा’ माध्यम सप्ताहास सुरुवात

प्रतिनिधी / सोलापूर

पर्यावरण ही व्यापक संकल्पना आहे. मानवी जीवनाशी निगडित प्रत्येक विषयांशी पर्यावरणाचा थेट संबंध येतो, ही बाब नीटपणे समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दै.तरुण भारत संवादचे आवृत्तीप्रमुख रजनीश जोशी यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे पत्रकार दिनानिमित्त 1 ते 6 जानेवारी 2021 दरम्यान ‘जागर पत्रकारितेचा’ या माध्यम सप्ताहास शुक्रवारी सुरुवात झाली. त्यावेळी ‘पर्यावरण पत्रकारिता’ या विषयावर जोशी बोलत होते.

जोशी पुढे म्हणाले की, लोकसंख्यावाढ, औदयोगिकीकरण व मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत आहे. कारखान्यांमुळे जल व वायू प्रदूषणात वाढ होत आहे. मानवाचा सततचा हस्तक्षेप पर्यावरणाची हानी होण्यास कारणीभूत ठरत आहे. यासंदर्भात जागृती निर्माण करण्याची गरज आहे. पर्यावरण पत्रकारितेसाठी सखोल अभ्यास आवश्यक आहे. या क्षेत्रात करिअर संधीही भरपूर आहेत.
यावेळी जोशी यांनी पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या उपक्रमांचे अनेक दाखले दिले. समाजात पर्यावरण विषयक चांगले काम करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था आहेत. त्यांचे काम पुढे आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन पत्रकारितेत करिअरच्या संधी

‘ऑनलाईन पत्रकारिता’ या विषयावर मयूर गलांडे ( लोकमत , मुंबई ) यांनी मार्गदर्शन केले. गलांडे म्हणाले की, सध्याच्या आधुनिक युगात ऑनलाईन पत्रकारितेला महत्व प्राप्त झाले आहे. नव्या पिढीसाठी हे एक सशक्त माध्यम बनू पाहात आहे. तरुण पिढीचा सर्वाधिक वेळ हा मोबाईलसोबत जात असतो. त्यामुळे मोबाईल हा ऑनलाईन पत्रकारितेचा अविभाज्य घटक बनला आहे. या पत्रकारितेला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नाहीत. जगाच्या कानाकोपऱ्यातील बातमी आपण कोठेही बसून लिहू किंवा वाचू शकतो. या माध्यमासमोर फेकन्यूजचा धोका असला तरी त्यावरही उपाय आहेत. हे माध्यम नव्या पिढीत लोकप्रिय होताना दिसत आहे. यावेळी गलांडे यांनी Search Engine Optimization (SEO), सोशल मीडिया मार्केटिंग याबाबतही मार्गदर्शन केले.

प्रारंभी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी प्रास्ताविक करताना माध्यम सप्ताहाच्या आयोजनामागची भुमिका सांगितली. या माध्यम सप्ताहाच्या यशस्वितेसाठी डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे , डॉ. बाळासाहेब मागाडे , ऋषिकेश मंडलिक यांनी ऑनलाईन आयोजनासाठीचे कार्य केले. या ऑनलाईन कार्यक्रमात विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. , २ जानेवारी रोजी ‘संपादकीय पानाचे महत्व’ या विषयावर तरुण भारत सोलापूरचे संपादक विजयकुमार पिसे तर ‘माध्यमातील करिअर संधी या विषयावर माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे माजी संचालक सुरेश वांदिले ( मुंबई ) हे मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

तेरणा साखरची निविदा १ एप्रिल पुर्वी न काढल्यास आंदोलन

Archana Banage

सोलापूर शहरात नव्याने 45 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

Archana Banage

एकनाथ शिंदे हे राजकारणातील मॅराडोना..: आ. शहाजी पाटील

Abhijeet Khandekar

अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणीसाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

Archana Banage

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक घोषित करावे : परशुराम वाडेकर

prashant_c

सोलापूर ग्रामीणमध्ये २४४ रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage