Tarun Bharat

पर्रीकरांनी आजची कविडस्थिती योग्यरीत्या हाताळली असती- किरण कांदोळकर

थिवीबरोबर हळदोणातही जिंकणार

प्रतिनिधी / म्हापसा

स्व. मनोहर भाईचे प्रशासन आणि डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मनोहर पर्रीकर हे मनोहर पर्रीकर. जेव्हा लॉकडाऊन कोविडचा विषय आला तेव्हा आमचे विरोधकसुद्धा म्हणाले की, आज पर्रीकरांची गरज होती. ही स्थिती ते योग्यरीत्या हाताळणार असते. त्यांना सर करणारा दुसरा राजकारणी तयार होणे खूप कठीण काम आहे. आज सरकार कुणाच्या दबावाखाली चालते हे सर्वांनाच माहीत आहे त्यावर आपण भाष्य करू पाहत नाही. अशी माहिती थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी दै. ‘तरुण भारत’ला बोलताना दिली.

क्रांती घडविणारे एकत्रित पुढे जाणार

पुढे बोलताना कांदोळकर म्हणाले की, भाजपने थिवी मतदारसंघात कमिटीही निवडली नाही. राज्याची समिती उत्तर गोवा महानंद अस्नोडकर यांची निवड केली मात्र थिवीला यातून डावलण्यात आले. बुथ कमिटीही थिवीत नाही. सर्वत्र भाजपच्या बैठका होऊ लागल्या मात्र आम्हाला मुद्दामहून डावलण्यात आले. त्यामुळे आम्हीच बाजूला राहणे पसंत केले. आज सदानंद शेट तानावडे भाजपा अध्यक्ष आहेत पुढे जाऊन ते थिवीचे आमदार होऊ शकतात असे त्यांना वाटत असेल. निळकंठ हणर्ळकरांना काँग्रेसमधून भाजपात आण्यात आले आहे. त्यांनाही तिकिटाचे आश्वासन दिले असणार. तिघांच्या भांडणात मारामारी का. म्हणून आपण बाजूला सरून क्रांतिकारी पक्ष नव्हे तर राज्याच्या ज्या जागा आहेत, चांगल्या विचारांचे, भ्रष्टाचारमुक्त व क्रांती घडविणारे जे लोक आहेत त्यांना एकत्रित येऊन अपक्षरीत्या पुढे जाण्याचा विचार केला आहे. असे त्यांनी सांगितले.

थिवीचा दावा कदापी सोडणार नाही

येत्या निवडणुकीत आपण भाजपा विरोधात वेगळी चाल रचणार काय? असा प्रश्न त्यांना केला असता श्री. कांदोळकर म्हणाले की, 2017 मध्ये आपला पराभव झाला त्यानंतर मी व भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे भाजपसाठी काम केले मात्र काँग्रेसमधून जेव्हा निळकंठ हळर्णकर भाजपात आणले तेव्हा आम्ही ठरविले की आमचा दावा आहे तो कदापी सोडणार नाही कारण भाजपची जी लॉबी आहे ‘थिवीचे कार्यकर्ते, लोक किरण कांदोळकरांबरोबर आहे’. त्यामुळे थिवीचा दावा मी कदापी सोडू शकत नाही. हळदोणे वा थिवी कांदोळकरच हा उमेदवार असणार आहे अशी माहिती किरण कांदोळकरांनी दिली.

थिवीबरोबर हळदोणातही जिंकू

थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकरांना घाबरून तुम्ही हळदोणात प्रवेश करीत आहेत काय. यावर ते म्हणाले की, आम्ही आमची राजकीय ताकद वाढविण्याचे काम करीत आहोत. हळदोणेचे नतृत्व आम्ही करता आणि थिवीबोरबर हळदोणाही आम्ही जिंकू शकतो तर पुढे का जाऊ नये. येत्या 6 महिन्यात निवडणूक झाली तरी दोन्ही मतदारसंघात आम्ही शंभर टक्के जिकू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऍड. नार्वेकरांची मदत गरजेची

माजी सभापती तथा उपमुख्यमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर हे गेल्या निवडणुकीत आपल्या विरोधात झटले हे खरे आहे. ते 1977 सालापासून राजकारणात सक्रीय आहे. आपण सदैव त्यांचा सन्मान, मान दिलेला आहे. राजकारणात सदैव आपण त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. विधानसभेत मागण्यात आपण रवींद्र भवनवर बोलत होतो. लहानपणी नार्वेकरांच्या माटवात सिनेमा, नाटके पाहत होतो पण त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. त्यांच्या विरोधात आपण बोलूच शकत नाही. त्यांच्याबद्दल काहीच वाकडे नाही. त्यांची मदत आपल्यास आवश्यक आहे. ते एक धुर्त राजकारणी आहेत. त्यांच्याकडे जाण्याची आपली गरज आहे. यापूर्वी भाजपचे मोठे नेते त्यांचा सल्ला घेत होते. आम्ही यापुढेही राजकारणात गोलो तरी ऍड. दयानंद नार्वेकर यांचे मार्गदर्शन घेणारच आहोत. राजकारणाबाबत वाटचाल कशी करावी हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

आठ मतदारसंघ आम्ही टार्गेट केलेले आहेत. काही आमदार नेते मंडळी आमच्या संपर्कातही आले आहेत. त्या लोकांनी आम्हालाही राजकारणात आम्हालाही राजकारणात उतरण्याची इच्छा आहे असे बोलूनही दाखविले आहे. आता कोविडचा काळ आहे तेथे लक्ष देणे गरजेचे आहे. येत्या काळात आठच नाही तर जनतेने ठरविले तर काहीही होऊ शकते. लोकांच्या इच्छेप्रमाणे थिवी वासियांच्या मार्गदर्शनाखाली थिवीच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यात येईल. असे श्री. कांदोळकर यांनी सांगितले.

टॅक्सीचालकांना सरकारने पॅकेज द्यावी कोविडच्या प्रभावात सर्वजण त्रासात पडले आहेत. त्यात टॅक्सी पायलट, रीक्षा वाल्यांवर संकट आले आहे. सरकारने गोवा माईल्स ऍप आणला त्यात टॅक्सीवाल्यांना खूप त्रास झाला हा एकच व्यवसाय बहुजन समाजाच्या हातात आहे. यावर सरकार सांभाळण्यास कुठेतरी कमी पडला आहे. सरकारने त्याचाच एक ऍप आणून चालविण्यास दिले असते तरी आज चित्र वेगळे असते. त्यावेळी स्व. मनोहर पर्रीकरांनी खाण व्यवसायासाठी पॅकेज दिले त्याप्रमाणे सरकारने टॅक्सी आदींना छोटी पॅकेज द्यावी जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होण्यास मदत होईल असे श्री. कांदोळकर म्हणाले.

Related Stories

मुख्यमंत्री आज घेणार प्रमुख खात्यांच्या 10 वर्षांचा आढावा

Omkar B

मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी पालक, शिक्षकांनी पुढाकार घ्यावा

Amit Kulkarni

बार्देश तालुक्याचा ताबा पुन्हा समितीकडे सुपूर्द करा

Patil_p

विरोधकांना म्हादईची काळजी नाहीच

Amit Kulkarni

दाबोळीचा भरीव विकास झाला, लवकरच अनेक प्रकल्प होणार

Amit Kulkarni

मळार-ओल्ड गोवा येथे आज ‘ना म्हणप ना’ नाटय़प्रयोग

Amit Kulkarni