Tarun Bharat

पर्वरी आमदाराचे भाजपशी फिक्सिंग

प्रतिनिधी/ पणजी

पर्वरीचे आमदार रोहन खंवटे आणि भाजप यांच्यात फिक्सिंग असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो आणि पर्वरी काँग्रेस गटाध्यक्ष शंकर फडते यांनी केली आहे.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की पर्वरीच्या या आमदाराने भाजपशी हातमिळवणी केली असून मंत्रीपद मिळावे म्हणून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना मुख्यमंत्री करून आपल्या पदरात मंत्रीपद पाडून घेण्याचे खंवटेचा डाव आहे. तो मुख्यमंत्र्यांनी उधळून लावावा. पर्वरीचे आमदार फक्त मंत्री लोबो, मुख्यमंत्री सावंत व भाजपचे गोडवे गात असून मंत्रीपदासाठी हपापलेले आहेत. त्यांनी भाजप किंवा मंत्र्यांच्या विरोधात कधीच आवाज उठवलेला नाही. भाजपने देखील आपले पदाधिकारी खंवटेच्या दावणीला बांधले आहेत, असा दावा डिमेलो यांनी केला. पर्वरी विधानसभेची जागा भाजपने दिखाऊ उमेदवार उभा करून खंवटेसाठी सोडली होती हे आता लपून राहिलेले नाही, असेही ते म्हणाले.

खंवटे हे युवकांना फूस लावून त्यांचा गैरवापर करीत आहेत. त्याला मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी आळा घालावा. जी-6 हा गट त्यांनी केला होता. तो संपुष्टात आला म्हणून बरे झाले, असेही डिमेलो यांनी नमूद केले.

Related Stories

लोकशाहीचे खुनी काँग्रेसच

Patil_p

मगो पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार सोपटेंनी आणले विघ्न

Patil_p

सत्तेवर आल्यास राज्य पातळीवर ओपिनियन पोल दिवस साजरा करू : काँग्रेस

Amit Kulkarni

म्हापसा गांधी चौकाजवळील 13 गाळे पालिका जमीनदोस्त करणार

Amit Kulkarni

बार्से येथे कंटेनरला पाठीमागून धडक, दोन्ही वाहनांची हानी

Patil_p

विदेशातील 252 गोमंतकीय खलाशी राज्यात दाखल

Amit Kulkarni