Tarun Bharat

‘पर्सनल चॅट लीक करू नका’; दिशाची उच्च न्यायालयात धाव

बेंगळूर/प्रतिनिधी

पर्यावरणवादी म्हणून संपूर्ण जगभरात ओळख असलेल्या ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिशा रवीला अटक केली होती. सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर असलेल्या दिशा रवीने दिल्ली पोलिसांविरोधातच आता न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दिशाने याचिका दाखल केली असून ‘या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा माहिती लीक केली जाऊ नये, याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात यावेत’, अशी मागणी दिशाने केली आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंब्याच्या आडून कट-कारस्थान केल्याच्या आरोपाखाली दिशा रवीला १३ फेब्रुवारीला बेंगळूरहून अटक केली होती. दिशा रवीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने अखेर दिशाला ३ आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिशा रवी आणि स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्यातील कथिक व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा काही भाग सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये देखील व्हायरल केला जात आहे. त्यावरून दिशा रवी आणि ग्रेटा थनबर्ग यांनीच कथित टूलकिट व्हायरल केल्याचा निष्कर्ष देखील काढला जात आहे. द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार, ‘अशा प्रकारे प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती किंवा व्हॉट्सअ‍ॅप चॅट किंवा त्याचा काही भाग प्रसारमाध्यमांमध्ये लीक केला जाऊ नये’, अशी मागणी दिशा रवीकडून करण्यात आली आहे.

Related Stories

सीमाप्रश्नी आता 23 नोव्हेंबरला सुनावणी

Patil_p

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढविला

Archana Banage

आयआयटी मद्रास सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था

Patil_p

दिल्लीत 486 नवे कोरोनाबाधित; 19 मृत्यू

Tousif Mujawar

हिमाचल प्रदेश : ‘या’ दिवसापासून सुरू होणार शाळा आणि कॉलेज

Tousif Mujawar

एअरटेलच्या मोबाइल ग्राहकांमध्ये घट

Patil_p