Tarun Bharat

पर्ससीन नौकांना बंपर मासळी

प्रतिनिधी/ रत्नागिरी

पर्ससीन नौकांना गेले देन-तीन दिवस बंपर मासळी मिळाली आह़े  सुमारे एकेका नौकेला दीड ते दोन टन गेदर मासळी मिळाली आहे. (एक जाळी 32 किलोची) एका जाळीला 4500 दर †िमळाला आह़े  तर खराब गेदर मासळी 10 रुपये प्रति किलोने विक्री झाल्याची कुजबुज मिरकरवाडा बंदरावर सुरु होत़ी

  पर्ससीन मासेमारीला बंदी आह़े बंदी असतानाही मासेमारीसाठी गेलेल्या काही पर्ससीन नौकांना बंपर मासळी मिळत असल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े तसेच अवैध मासेमारी रोखण्यासाठी बंदरावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱयासमोरच हा प्रकार सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आह़े  30 मे नंतर पारंपरिक मासेमारी हंगाम संपुष्टात येणार आह़े मात्र राजरोसपणे सुरु असणाऱया पर्ससीन मासेमारीसमोर पारंपरिक मच्छीमारांना नाममात्र मासळी मिळत आह़े त्यामुळे पारंपरिक मच्छीमार हवालदिल झाला आह़े

  गेले दोन-तीन दिवस काही पर्ससीन नौकांना मासळी मिळाली. काहींना काहीच नाही, अशी परीस्थिती होत़ी  काही पर्ससीन नौकांना मुबलक प्रमाणात मासळी आह़े मात्र बंदी कालावधी असतानादेखील पर्ससीन नौकांना मोठय़ा प्रमाणात मासळी मिळत असल्याचे दिसून येत आह़े या प्रकरणी मत्स्य विभागाचे कर्मचारी काहीच कारवाई करत नसल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांनी नाराजी व्यक्त केली आह़े

Related Stories

बसणीतील श्री महालक्ष्मीला सोनेरी किरणांचा अभिषेक

Patil_p

हर्णे बंदरात दुकान भस्मसात

Patil_p

तेरेखोल नदीच्या पाण्याने बांदा-दाणोली मार्ग पाण्याखाली

Anuja Kudatarkar

डॉ.आंबेडकरांना एकाच जातीत बांधता येत नाही!

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची विक्रमी रुग्णवाढ

Patil_p

रत्नागिरीत 62 वर्षीय वृद्धाचा कोरोनामूळे मृत्यू

Archana Banage