Tarun Bharat

”पलूस कडेगाव येथील प्रादेशिक वन विभागात वनरक्षकच बनले वनभक्षक”

वार्ताहर / कुंडल

पलूस कडेगाव येथील प्रादेशिक वन विभागात राजरोसपणे वृक्षचोरी होत आहे आज वनरक्षकच वनभक्षक होत आहेत. अशा परखड शब्दात आमदार अरुण लाड यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडली, संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होण्यासाठी त्यांनी मागणी करून कडेगाव तालुक्यातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्यासाठी शासन दरबारी दाद मागितली.

त्यांनी यावेळी शासनाच्या अतिशय चांगला असा वृक्ष लागवड उपक्रम असताना या उपक्रमाला ही अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवत वृक्ष तोड केली जात असल्याचे मांडले. संगनमताने होणाऱ्या वृक्ष तोडीलाही लगाम बसण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी मांडले.

तसेच मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याच्या बाजूच्या कुंपणाची नासधूस झाल्याने हरणे, काळवीट बाहेरील शेतीचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्याने ही तेथे पीक लावण्याचे सोडून दिले आहे, यासाठी बंदीस्थ कुंपणाची तर गरज आहेच शिवाय अभयारण्यात गवत आणि वृक्ष लागवड होणे गरजेचे असताना अज्ञात कारणाने आहे. ते गवत ही जाळण्याचा प्रकार केला जात आहे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली.

Related Stories

संजय नगर येथील महापालिकेचे घरकुल राम भरोसे, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

Archana Banage

बुधगावच्या नवीन पाणी योजनेची यशस्वी चाचणी

Archana Banage

मिरजेत बिबट्याची कातडी, सांबरांची शिंगे आणि खवल्या मांजराच्या खवल्या जप्त

Archana Banage

भोसे येथे शेतातील रस्त्यावरुन महिलेला मारहाण

Archana Banage

सांगली : वाळवा तालुक्यातील सरपंच आरक्षणात खुशी-गमची अनुभूती

Archana Banage

सांगलीचा मृत्युदर राज्यांपेक्षा जास्त – देवेंद्र फडणवीस

Archana Banage