Tarun Bharat

पवारांवरील ‘ते’ वक्तव्य भोवलं; राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बेछूट आरोप केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश राणे सिंधुदुर्गात एका पत्रकार परिषदेत शरद पवारांचे नाव दाऊदसोबत जोडले होते. ते म्हणाले होते की, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत. शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, ज्याने बॉम्बस्फोटातील आरोपींना पैसे दिले. दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, त्या नवाब मलिकांना पाठीशी का घातले जाते, कोण लागतो नवाब मलिक शरद पवारांचा? मलिक खरे बोलले तर, पवार यांच्याबद्दल माहिती उघड होईल, अशी त्यांना भीती असल्याचा मला संशय आहे. तर नितेश राणे यांनीही आझाद मैदानातील मोर्चादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांची जीभ घसरली होती.

या सर्व प्रकरणानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत राणे बंधुंविरोधात पोलिसात धाव घेतली. राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जाणीवपूर्वक समाजामध्ये द्वेषाच्या भावना वाढवण्याच्या उद्देशाने भाष्य करुन दंगल घडविण्याचा कट रचत असल्याबाबत आणि शरद पवार यांचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडून त्यांच्या जिवाला धोका निर्माण केला आहे. या तक्रारीनंतर राणे बंधुंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

मागासवर्गीय आरक्षण सुधारणा अध्यादेश

Archana Banage

मागील 24 तासात महाराष्ट्रात 434 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; 4 मृत्यू

Tousif Mujawar

भारत-अफगाणिस्तान विमानसेवा सुरू करा; तालिबानची मागणी

datta jadhav

कोरोना : योगगुरू रामदेव यांच्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचे निधन

Tousif Mujawar

PM मोदी रोममध्ये दाखल; G-20 शिखर परिषदेत होणार सहभागी

datta jadhav

रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धेला लोकमान्य सोसायटीतर्फे विशेष प्रोत्साहन

Tousif Mujawar
error: Content is protected !!