Tarun Bharat

पवार थांबले… राजकारणाच्या नव्हे तर खुल्या आसमानाखालच्या लग्नाच्या मांडवात..!

Advertisements

संकेत कुलकर्णी / पंढरपुर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ज्याठिकाणी उभे राहतात. तिथे राजकीय सभाचा मांडव आपसुक उभा राहतो. हे सर्वश्रूतच आहे. पण शुक्रवारी पंढरपूर तालुक्यात खा.शरद पवार रस्त्यावर थांबले…. आणि त्याठिकाणी राजकारणाचा नव्हे तर खुल्या आसमानाखालचा चक्क लग्नाचा मांडव उभा राहिला. निमित्त होते रस्त्यावर थांबलेल्या सुरज शिंदे या सामान्य नवविवाहीत तरुणाच्या भेटीचे.

त्याचे घडले असे की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्व.आ. भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी निघाले होते. तालुक्यातील सरकोली येथे जात असताना वाटेतच रांजणी याठिकाणी सुरज शिंदे या नवविवाहित दांपत्याने पवारांच्या गाडीचा ताफा अडवला. आणि ललाटी बाशिंग बांधलेले सुरज आणि त्यांच्या पत्नी या वधू-वरांनी पवार यांना नमस्कार केला. विशेष म्हणजे पवार यांनी देखिल नव वधू-वरांची चौकशी करुन त्यांना भावी आयुष्यास शुभेछ्या देत. आशिर्वाद दिले. यावेळी उपस्थित सुरक्षेसाठी असणारया पोलिस यंत्रणेसह रांजणी गावातील ग्रामस्थ देखील चकित झाले. अन पुन्हा चर्चिला आला शरद पवारांचा राजकारणातील साधेपणा.

सध्या लग्नसराईचे दिवस चालू आहेत. प्रत्येक नव वधू-वरास आपल्या विवाहास सेलिब्रिटी यावा. आपला विवाह संस्मरणीय व्हावा. असे स्वप्न असते. असेच स्वप्न पंढरपूर तालुक्यातील गादेगावच्या सुरज शिंदे याचे पवारांच्या भेटीने पूर्ण झाले. कारण सुरजला त्यांच्या विवाहाप्रित्यर्थ चक्क राजकारणातील महाराष्ट्राचे सेलिब्रेटी असणारे शरद पवार यांनी आशीर्वाद दिले. यासाठी रस्त्यावरच्या खुल्या आसमानाचा मांडव होता. त्यामुळे सुरजचा विवाह संपूर्ण महाराष्ट्राला लक्षात राहण्यासारखा आहे.

Related Stories

सोलापूर : पडळकरांना झालेल्या धक्काबुक्कीचा पंढरपूरात निषेध

Abhijeet Shinde

महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सिझेरियन शस्त्रक्रियेचा लाभ

Abhijeet Shinde

राऊत यांच्या वक्तव्याचा मराठा मोर्चाकडून निषेध

prashant_c

परीक्षेसाठी सोलापूर विद्यापीठाकडून हेल्पलाईन नंबर जाहीर

Abhijeet Shinde

उस्मानाबाद : नियम तोडणारा जिल्हा परिषद अधिकारी सक्तीच्या रजेवर

Abhijeet Shinde

सोलापूर : किणीत ४५ शेळ्या-बकऱ्यांवर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!