Tarun Bharat

पशुखाद्य दरवाढीप्रकरणी दुध उत्पादकांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Advertisements

प्रतिनिधी/ फोंडा

गोवा डेअरीने पशुखाद्याच्या दरात रू. 4 प्रति किलोने केलेल्या दरवाढीबाबत शेतकऱयांचे हित जपणारा कोणताच निर्णय घेण्याची तत्परता न दाखविल्यामुळे दुध उप्तादकांनी काल बुधवारी डेअरी गेटसमोर फेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनकर्ते पशुखाद्य दरवाढ मागे घ्या या मागणीवर ठाम राहिले. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासक अरविंद खुटकर यांनी दुध उप्तादकांशी बैठक घेतली. डेअरीवर आर्थिक बोजा वाढू नये, तसेच शेतकऱयाचेही हित जपले जावे अशा सुवर्णमध्य  निर्णयासाठी आज गुरूवार दुपारी 11.30 वा. डेअरी प्रशासक व शेतकरी मुंख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यांशी आल्तीनो येथील महालक्ष्मी निवासस्थानावर भेट घेण्याच्या अटीवर आंदोलन स्थगित ठेवण्यात आले आहे.

 शुक्रवार 17 जाने. रोजी 30 दुध उत्पादकांनी दरवाढीच्या मुद्दावर गोवा डेअरीच्या प्रशासकांशी चर्चा करण्यासाठी गेटसमोर धरणे धरली होती. त्यानंतर सोमवार 20 रोजी चर्चा फिस्कटल्याने सुमारे 300 शेतकऱयांनी आंदोलन पुकारले होते. चर्चेअंती प्रशासक अरविंद खुटकर यांनी दिलेले दोन प्रस्ताव दुध उत्पादकांना मान्य नसल्याने डेअरीच्या गेटसमोर त्यांनी धरणे धरली. 16 जानेवारी 2020 रोजीपासून झालेली पशुखाद्य दरवाढ स्थगित ठेवा अशी जोरदार मागणी शेतकऱयांनी केली होती. गोवा डेअरीने शेतकऱयांच्या पशुखाद्यात केलेल्या वाढीनुसार शेतकऱयांकडून घेत असलेल्या दुधाला मोबदला म्हणून प्रति लिटर समांतर दरवाढीच्या हिशोबाने वाढवून द्यावा या मागणीवर ठाम राहिले होते.

दरवाढ कमी केल्यास दरमहा  रू.58 लाख नुकसानी  

गोवा डेअरीचा मारवासडा-उसगांव येथे असलेला पशुखाद्य प्रकल्प सुरळीत ‘ना-तोटाöना नफा’ या तत्वावर चालविण्यासाठी डेअरीने केलेली रू. 4 प्रति किलो दरवाढ रास्त असल्याचा दावा केला जातो. जर पुर्वीच्या दराने पशुखाद्याची विक्री केल्यास डेअरीवर आर्थिक बोजा वाढणार आहे. दर महिन्याकाठी रू. 58 लाख नुकसानी डेअरीला सहन करावी लागेल. जोपर्यत डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प, आईस्क्रिम प्रकल्प व डेअरी दुध प्रकल्प सक्षम होत नाही तोपर्यत डेअरी नफ्यात  येणार नाही. यावर सुवर्णमध्य साधण्यासाठी मुख्यमंत्री आज कोणता निर्णय घेतात यावर सर्व आंदोलनकर्त्या शेतकऱयांची नजर लागून राहिली आहे.

पशुखाद्य दरवाढी कारणामुळे गोंधळ

 सद्य परीस्थितीत गोवा डेअरीवर कार्यरत असलेले एमडी अनिल फडते यांनी दुध सोसायटींना पशुखाद्य दरवाढी संदर्भातील पत्रातील मजकूरात जीएसटीमुळे वाढ करीत असल्याच्या मुद्यामुळेचे शेतकरी खवळले. या आंदोलनामागे हाच खरा कळीचा मुद्दा असल्याचे शेतकरी बोलत होते. 2017 साली जीएसटी वाढल्यामुळे  रू. अडीच प्रति किलोने पशुखाद्यात वाढ करण्यग्नात आली होती. तरीही परत जीएसटीमुळे दरवाढ का? अशा सभ्रमात शेतकरी सापडल्यामुळे गेंधळ उडालेला आहे. एमडी फडते यांनी याची दक्षता घेताना पशुखाद्याच्या कच्चा मालात झालेल्या वाढीची व इतर विषय समजावून सांगितले असते तर आंदोलनाची वेळच शेतकऱयावर आली नसती अशीही चर्चा काही शेतकरी करीत आहे. शेतकरी सभ्रमात असून पशुखाद्य दरवाढ तात्काळ रद्द करावी अन्यथा दरवाढीच्या समान दरवाढ शेतकऱयाकडून घेत असलेल्य़ा दुधाला द्यावी या मागणीवर ठाम राहिल्याचे चित्र दिसत आहे.

 दरम्यान दूधउत्पादकांसोबत प्रशासकांनी काल बैठक घेतली. यावेळी प्रशासक अरविंद खुटकर यांनी शेतकऱयांच्या सर्व अडचणी जाणून घेतल्या तसेच शेतकऱयाचेही हित जपले जावे अशा सुवर्णमध्य निर्णयाची अपेक्षा आज मुख्यमंत्र्यांशी होणाऱया चर्चेतून केली आहे.

Related Stories

पोळे ते माशेपर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण गेले वाहून

Amit Kulkarni

वाढीव पाणीबिलांमुळे संतप्त दवर्लीवासियांकडून घेराव

Amit Kulkarni

भाजपाने मंत्र्याच्या ज्येष्ठता यादीतून आपला खरा चेहरा

Amit Kulkarni

म्हापसा विठ्ठल रखुमाई मंदिरात 15 रोजी महाएकादशी

Amit Kulkarni

जनाधार कुणाला? आज फैसला

Patil_p

कोरोना बळीची संख्या वाढल्याने सर्वत्र चिंता

Omkar B
error: Content is protected !!