Tarun Bharat

पशुवैद्यकीय दवाखान्याचे लवकरच स्थलांतर

Advertisements

महांतेशनगर येथे मल्टिस्पेशालिटीचे काम पूर्ण : मार्चमध्ये होणार उद्घाटन

प्रतिनिधी /बेळगाव

पशुधनाला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता महांतेशनगर येथे जनावरांसाठी भव्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. या हॉस्पिटलचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच उद्घाटन होणार आहे. दरम्यान, सन्मान हॉटेलजवळील पशुवैद्यकीय दवाखान्याचे महांतेशनगर येथे स्थलांतर होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पशुपालकांच्या जनावरांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.

अलीकडे जनावरांची संख्या वाढली आहे. जिल्हय़ात तब्बल 28 लाख इतकी पाळीव जनावरे आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, मेंढी, मांजर, गाढव, घोडा, डुक्कर आदींचा समावेश आहे. या जनावरांना वेळेत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुसज्ज अशी इमारत उभारली आहे. याठिकाणी कृत्रिम गर्भधारणा, रोग निदान, राष्ट्रीय योजना, उपचार, औषधोपचार यासह इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

सन्मान हॉटेलजवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात जागेअभावी जनावरांना आरोग्याच्या सुविधा पुरविताना अडचणी निर्माण होत होत्या. शिवाय अत्याधुनिक मशीनदेखील नसल्याने अवघड शस्त्रक्रिया करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे पशुपालकांना सुविधा वेळेत मिळत नव्हत्या. याकरिता महांतेशनगर येथील दवाखान्यात एकाच छताखाली सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. याबरोबर याठिकाणी प्रयोग शाळा उभारून रक्त निदान चाचणी, रक्त तपासणी यासह अवघड शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत.

प्रत्येक 5000 जनावरांमागे 1 पशुवैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत 10,000 जनावरांमागे देखील 1 पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे जनावरांना सुविधा पुरविणे मुश्कील बनत आहे. आधीच जनावरांच्या दवाखान्यांची संख्या कमी आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून पशुवैद्यकीय खात्यातील जागा भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पशुवैद्यकीय सेवा पुरविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मार्च महिन्यात होणार असल्याने लवकरच पशुपालकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

हॉस्पिटलचे काम शेवटच्या टप्प्यात

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. मार्चच्या दुसऱया आठवडय़ापर्यंत उद्घाटन करून सेवा सुरू केली जाणार आहे. जागा मुबलक  प्रमाणात असल्याने उपचार वेळेत होणार आहेत. शिवाय अत्याधुनिक साधन सामग्रीदेखील उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे जनावरांच्या रोगाचे अचूक निदान होणार आहे.

– ए. के. चंद्रशेखर (उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)

Related Stories

चित्रकलेचे जिद्दी उपासक विद्याधर यादव

Amit Kulkarni

बेळगावात दाखल झाली नैसर्गिक अळंबी

Omkar B

जमखंडीत परिवहन कर्मचाऱयांना लसीकरण

Patil_p

वैश्यवाणी समाजाचे प. पू. वामनाश्रम स्वामीजींचे स्वागत

Patil_p

खानापूर तालुक्यातील 9 गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

Patil_p

कर्लेत गवत गंजीला आग लागून शेतकऱयाचे 75 हजाराचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!