Tarun Bharat

पशुसंगोपन खात्यात लवकरच नियुक्त्या

डॉक्टर, कर्मचाऱयांच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांची अनुमती

बेळगाव

पशुसंगोपन खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिली आहे, अशी माहिती पशुसंगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गो-हत्या बंदी कायद्यामुळे प्रत्येक जिह्यात गो-शाळा, प्राणी कल्याण साहाय्यवाणीसह अनेक योजना जारी करण्यात येत आहेत. डॉक्टर व कर्मचाऱयांच्या कमतरतेमुळे या योजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत होती. वेगवेगळय़ा जिह्यांच्या दौऱयाच्या वेळी रिक्त पदे भरण्याची मागणी केली जात होती.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कारकिर्दीतही कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. अर्थखात्याच्या अधिकाऱयांशी केलेल्या चर्चेमुळे कर्मचाऱयांच्या नियुक्तीसाठी असलेले अडथळे दूर झाले होते. आता बसवराज बोम्माई यांनी कर्मचाऱयांच्या नियुक्तीसाठी परवानगी दिली आहे, असेही प्रभू चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.

कर्मचाऱयांच्या नियुक्तीनंतर पशुसंगोपन खात्याकडून राबविण्यात येणाऱया विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी गती मिळणार आहे. पशुवैद्याधिकाऱयांच्या नियुक्तीसाठीही अनुमती मिळाली असून लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे पशुसंगोपन मंत्र्यांनी सांगितले. 

Related Stories

अरिहंत हॉस्पिटलमध्ये तिसरी टावी शस्त्रक्रिया यशस्वी

Rohit Salunke

बेळगावमध्ये शेतकऱयांचे आंदोलन

Amit Kulkarni

कौशल्य विकासातून स्त्री सबलीकरणाला ‘संजीवनी’

Amit Kulkarni

आरपीडीमध्ये राष्ट्रीय वाचन सप्ताह

Amit Kulkarni

मुरुगेंद्रगौडा पाटील क्रिकेट स्पर्धा जानेवारीत

Amit Kulkarni

लष्कर भरतीकरिता कोरोना चाचणी सक्तीची

Amit Kulkarni