Tarun Bharat

पशुसंगोपन सुरू करणार गो-शाळा

Advertisements

जागेची पाहणी : गो-मातेचे होणार संवर्धन : हुक्केरीत 19 एकर चार गुंठे भू-संपादनाची प्रक्रिया लवकरच : इतर राज्यांच्या धर्तीवर प्रकल्प राबविणार

प्रतिनिधी /बेळगाव

दुग्धोत्पादनातून पशुपालकांचे जीवनमान उंचाविणाऱया, मात्र तेच उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणाऱया गो-मातांसाठी पशुसंगोपन खात्यामार्फत जिल्हय़ात गो-शाळा सुरू केली जाणार आहे. याकरिता हुक्केरी तालुक्मयात जागेची पाहणी झाली आहे. त्यामुळे दूध क्षमता संपल्यानंतर सोडून दिल्या जाणाऱया गायींना (भाकड गायी) ही गो-शाळा आधार ठरणार आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात आत्मनिर्भर गो-शाळा उभारल्या जाणार आहेत. गायींमधील काम करण्याची क्षमता संपल्यानंतर तसेच व्याधी झालेल्या गायींना सोडून दिले जाते. अशा गायींवर उपचार करण्याबरोबर त्यांचे पालन पोषणदेखील या गो-शाळेत होणार आहे. शिवाय महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांच्या धर्तीवर उपपदार्थ बनविणे, गो-आधारित शेती, सेंदिय खत, बायोगॅससारखे प्रकल्प राबविले जाणार आहेत.

पशुसंगोपन खात्यामार्फत जिल्हय़ात गो-शाळा सुरू केली जाणार आहे. याकरिता जिल्हय़ात जागेचा शोध सुरू झाला असून हुक्केरी येथील जागेची पाहणी झाली आहे. त्यामुळे दूध क्षमता संपलेल्या आणि भाकड काळातील गायींचा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्यात गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. शिवाय परराज्यांतील वाहतुकीवरही प्रतिबंध आहे. या कायद्यामुळे राज्यात गायींची संख्या वाढणार आहे. याकरिता शासनाने गो-शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गो-शाळा सुरू करण्यासाठी हुक्केरीत 19 एकर चार गुंठे जागेची पाहणी केली आहे. मात्र अद्याप भू-संपादनाची प्रक्रिया झालेली नाही. मात्र, लवकरच भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून कामाला प्रारंभ होणार आहे.

गो-मातेचे संरक्षण-संवर्धन

जिल्हय़ात गो-शाळा सुरू करण्यासाठी हुक्केरी तालुक्मयातील बेळवी येथे जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच गो-मातेचे संरक्षण होण्याबरोबर संवर्धन होणार आहे. तसेच नियमबाहय़ वाहतूक करतेवेळी मिळणाऱया गायींची रवानगीदेखील या गो-शाळेत होणार आहे.

– ए. के. चंद्रशेखर (उपनिर्देशक, पशुसंगोपन खाते)

Related Stories

मौलाना सिद्दीकी यांना खोटय़ा आरोपाखाली अटक

Amit Kulkarni

लॉकडाऊनमुळे शहर पुन्हा एकदा थांबले

Patil_p

कृष्णाकाठ योजनेसाठी 10 हजार कोटी

tarunbharat

दांडेलीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मगरीने नेले ओढून

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात कोरोना बाधितांची शंभरी पार

Rohan_P

मुचंडी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी अनिता वडेयार

Amit Kulkarni
error: Content is protected !!