Tarun Bharat

पशुसंवर्धनचे बजेट पोहोचले दोन कोटीवर

Advertisements

जि. प. पशुसंवर्धन समितीची मान्यता : जि. प. च्या निर्णयाकडे लक्ष

प्रतिनिधी / ओरोस:

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी दोन कोटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गुरुवारी झालेल्या पशुसंवर्धन समिती सभेत याला मान्यता देण्यात आली. यावषीपेक्षा सुमारे 41 लाखांनी अंदाजपत्रकात वाढ करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास समितीची मासिक सर्वसाधारण सभा बॅ. नाथ पै समिती सभागृहात सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी, सदस्य स्वरुपा विखाले, मनस्वी घारे, रोहिणी. गावडे, धुरी, तालुका पशु वैद्यकीय अधिकारी, अन्य विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 1 कोटी 60 लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र 2021-22 या वर्षासाठी यात वाढ करण्यात आली आहे. फ्याट मशीन, साथरोग औषधे, पशु वैद्यकीय दवाखान्यांची दुरुस्ती, परसबाग कुक्कुटपालन यासह अन्य काही योजनांचा निधी वाढविण्यात आला असल्याची माहिती राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली.

परसबाग कुक्कुटपालन नवी योजना

या योजनेंतर्गत 16 आठवडे वयाची 25 तलगे, सहा महिने पुरेल एवढे खाद्य आदींचा पुरवठा केला जाणार आहे. 21,250 रुपये एका युनिटचा खर्च धरण्यात आला असून 80 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर 4,250 रुपये लाभार्थ्याला भरावे लागणार आहेत. या कोंबडय़ांपासून मिळणारे 40 टक्के अंडी उत्पादन जि. प. कडून खरेदी केले जाणार आहे. या नवीन योजनेसाठी पशु-पक्षी प्रदर्शन अंतर्गतच्या 32 लखापैकी 17 लाखांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यावषी प्रायोगिक तत्वावर ही योजना असून पुढील वषी यासाठी वेगळी तरतूद केली जाणार असल्याचे म्हापसेकर यांनी सांगितले.

पशु वैद्यकीय दवाखाना उभारताना त्यात बोअरवेलची तरतूद करून अंदाजपत्रक केले जाते. मात्र अंदाजपत्रकाप्रमाणे निधी केवळ बांधकामवर खर्च केला जातो आणि बोअरवेलचं काम होत नाही, असा आरोप म्हापसेकर यांनी केला. यापुढे असं न करता ज्या ठिकाणी बोअरवेलसह इमारत बांधायची असेल, त्या ठिकाणी आधी बोअरवेल खोदावी आणि मग इमारत हाती घ्यावी, असे आदेशही म्हापसेकर यांनी दिले.

Related Stories

कर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल 9 लाखांचा गंडा

Patil_p

ऐनवरेत जनावरे वाहतूक; दोघांवर गुन्हा, टेम्पो जप्त

Archana Banage

शहर वाहतूक पोलीस लूटमारी करत असल्याचा आरोप

Patil_p

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Anuja Kudatarkar

दाणोली साटम महाराज पुण्यतिथी उत्सव साधेपणाने साजरा

NIKHIL_N

पाचवी ते आठवीच्या 763 शाळा सुरु

NIKHIL_N
error: Content is protected !!