Tarun Bharat

पशु-पक्ष्यांना पाणवठय़ांची आवश्यकता

वाढत्या उष्म्याचा परिणाम : तहान भागविण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज

प्रतिनिधी /बेळगाव

उष्म्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मनुष्याबरोबर पशु-पक्ष्यांनादेखील पाण्याची गरज भासत आहे. याकरिता प्राणीप्रेमी नागरिकांनी पशु-पक्ष्यांची तहान-भूक भागविण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला पशु-पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी पाणवठे आणि टे सुविधा पुरवावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.

यंदा मार्च महिन्यातच उष्म्याने उच्चांक गाठला आहे. पारा 36 अंशांच्या पुढे गेल्याने शरीराची लाहीलाही होत आहे. याबरोबर पशु-पक्ष्यांनादेखील पाण्याची नितांत गरज भासू लागली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पशु-पक्ष्यांना पाण्यासाठी झाडावरती टे उपलब्ध करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.

अलीकडे वृक्षसंख्येत वाढ झाली आहे. दरवषी हजारो वृक्षांची लागवड होत असल्याने त्यात भर पडत आहे. याबरोबर पक्ष्यांची संख्या वाढत आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे मनुष्याबरोबर पक्ष्यांनाही उष्णता असहय़ झाली आहे. त्यामुळे पशु-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

वनखात्याकडून उपाययोजना हाती

वनखात्याने पशु-पक्ष्यांसाठी वनक्षेत्रात पाणवठे आणि चारा उपलब्ध केला आहे. वाढत्या उष्म्यामुळे वनक्षेत्रात चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन्यप्राणीदेखील सैरभैर होताना दिसत आहेत. याकरिता खात्याने विविध उपाय हाती घेऊन प्राण्यांसाठी पाणवठे आणि चारा उपलब्ध केला आहे.

Related Stories

केएलएस जीआयटीमध्ये नूतन विद्यार्थ्यांचा समावेश

Omkar B

खरेदीला उधाण; बाजारपेठेत तुफान गर्दी

Amit Kulkarni

बस ‘बंद’चा परिणाम खानापूर बाजारपेठेवर

Omkar B

सदाशिवनगर येथे भाजी दुकान फोडले

Amit Kulkarni

कर्नाटक मराठा समाजाचे मंजुनाथ स्वामींचा सत्कार

Amit Kulkarni

पासपोर्ट सेवा केंद्राचे नव्या जागेत स्थलांतर

Patil_p