ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टल स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.1 एवढी आहे.


नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार राज्यातील दुर्गापूरमध्ये सकाळी 7.54 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.1 रिश्टल स्केल एवढी आहे. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.