Tarun Bharat

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; सहा भाजपा कार्यकर्ते जखमी

Advertisements

ऑनलाईन टीम

पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असतानाच अनेक ठिकाणी वादाचे, मारहाणीचे प्रसंग वारंवार घडत आहेत. यातच आज बॉम्बहल्ल्या सारखी घटना घडली आहे. या बॉम्बहल्ल्यात भाजपाचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यामधील दोघांची स्थिती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री लग्नावरुन परतत असताना काही अज्ञातांकडून हा बॉम्बहल्ला करण्यात आला.

जखमी भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. आपण लग्नातून परतत असताना बॉम्बहल्ला करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने भाजपा नेते वरुण प्रामाणिक यांनी हा बॉम्ब तिथे ठेवला होता, ज्यामध्ये त्यांचे सहा कार्यकर्ते जखमी झाले असा दावा केला आहे.

Related Stories

भोगावती येथे स्वाभिमानीचे चक्का जाम आंदोलन

Sumit Tambekar

खोजनवाडीत घरफोडी; साडेपाच लाखाचा मुद्देमाल लंपास

Abhijeet Shinde

अभिभाषणावर विरोधकांचे ‘बहिष्कारा’स्त्र

Amit Kulkarni

भारतीय रेल्वेने रचला इतिहास!

Rohan_P

राजस्थानमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ महामारी म्हणून घोषित

datta jadhav

सर्व लोकसभा विभागात लवकरच सुरू होणार पासपोर्ट सेवा केंद्र : जयशंकर

Rohan_P
error: Content is protected !!