Tarun Bharat

पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Advertisements

ऑनलाईन टीम

बंगालमध्ये भाजपा आणि तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संघर्ष काही केल्या कमी होत नाही. याच संघर्षातून राज्यात काही जणांच्या हत्या देखील झाल्या आहेत. यानंतर पुन्हा एकदा भाजपाच्या युवा नेत्याची हत्या झाली आहे. पक्षाचे युवा शाखा नेते मिथुन घोष यांची उत्तर दिनाजपूरच्या इटाहारमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. बंगालचे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी यासंबंधी माहिती दिली.
घोष यांच्या हत्येमागे तृणमुल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.

सुवेंदू अधिकारी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बीजेवायएम व्हीपी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील मिथुन घोष यांची इटाहार येथे हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. ही हत्या तृणमुल काँग्रेसने घडवून आणली आहे. रक्तरंजित असामाजिक शिकारी कुत्रे ज्यांनी आपल्या मालकाच्या आदेशाचं पालन करत मिथून घोष यांची हत्या केली. त्यांची वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असा इशारा अधिकारी यांनी मारेकऱ्यांना दिला आहे.

Related Stories

आमदार खाडेंच्या विकासकामांची चौकशी लावणार- बाळासाहेब होनमोरे

Archana Banage

गुजरात आप अध्यक्षपदी किशोरभाई देसाई

Patil_p

जितेंद्र आव्हाड यांचे वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा दान!

Tousif Mujawar

पुलवामातील हल्ल्यात सुरक्षा अधिकारी हुतात्मा

Patil_p

विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर, प्रियंका गांधी संतापल्या

Archana Banage

बँकांमधील निष्क्रिय खात्यांत 26 हजार कोटी रुपये पडून

datta jadhav
error: Content is protected !!