Tarun Bharat

पश्चिम बंगालमध्ये राज्यमंत्र्यावर बॉम्बहल्ला

डझनभर तृणमूल कार्यकर्तेही जखमी : हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप

कोलकाता / वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमध्ये राज्यमंत्र्यांवर बॉम्बहल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री उशिराने घडली. राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे डझनभर कार्यकर्ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुर्शिदाबाद जिल्हय़ातील निमतिता रेल्वे स्थानकावर हा हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी झाकीर हुसेन आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दिशेने बॉम्ब फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. बंगालमध्ये मंत्र्यावर हल्ला होण्याची गेल्या काही वर्षातील ही पहिलीच घटना आहे. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती.

बॉम्बहल्ल्यात झाकीर हुसेन यांच्या पायाला मोठी जखम झाली आहे. हुसेन यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी कोलकाता येथे हलविण्यात आल्याची माहिती तृणमूलचे मुर्शिदाबादमधील जिल्हाध्यक्ष अबु ताहेर यांनी दिली. मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून डॉक्टर हुसेन यांच्यावर उपचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. जखमी झालेले राज्यमंत्री हुसेन हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2016 च्या विधानसभा निवडणुकीत ते जांगीपूरमधून निवडून आले होते.

Related Stories

सिसोदियांचा आरोप, भाजपचे प्रत्युत्तर

Patil_p

देशातील कोरोना मृतांच्या संख्येत मोठी घट

datta jadhav

ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा ‘महाबली’ अवतार येणार

Patil_p

अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार राष्ट्रपती कोविंद

Amit Kulkarni

हिमाचल प्रदेश : 7 मे पासून कोरोना कर्फ्यू!

Tousif Mujawar

तेदेपला पुन्हा रालोआत आणण्याचा प्रयत्न

Patil_p