Tarun Bharat

पश्चिम बंगालमध्ये शाळा-कॉलेज बंद

कोलकाता / वृत्तसंस्था

वाढत्या कोरोना संसर्गामुळे पश्चिम बंगाल सरकारने 3 जानेवारीपासून निर्बंधांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार शाळा-महाविद्यालये पुढील काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच स्पा, सलून, ब्युटी पार्लर, प्राणीसंग्रहालये, मनोरंजन पार्क याठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली. सोमवारपासून राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालतील. या कालावधीत सर्व प्रशासकीय बैठकाही व्हर्च्युअल पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे बंगालचे मुख्य सचिव एच. के. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

Related Stories

साखर निर्यातीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

Patil_p

प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम 24 ऐवजी 23 जानेवारीपासून

Patil_p

देशाची लाडकी गानकोकीळा , गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन

Patil_p

गंगा नदीत बोट उलटली, ६ जण बेपत्ता

Archana Banage

केरळमध्ये 4.5 किमी लांबीचा केक

Patil_p

आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आता होम क्वारंटाईनमधून सुटका

Amit Kulkarni