Tarun Bharat

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; दोघांचा मृत्यू

Advertisements

सीएए समर्थक-विरोधक भिडले : एक जण गंभीर

कोलकाता

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्हय़ात आंदोलनादरम्यान दोन गट एकमेकांशी भिडल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण आले. यात समर्थक आणि विरोधकांच्या गटात देशी बॉम्ब फेकण्यात आले तसेच गोळीबार करण्यात आल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखली झाला असून, त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, हिंसाचाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तर जखमींना मुर्शिदाबाद वैद्यकीय महाविद्यालयात तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली. 

शाहीन बागेत मुस्लीम महिलांचे आंदोलन सुरूच

कोलकाताच्या शाहीन बागवर 60 मुस्लीम महिलांनी गेल्या 23 दिवसापासून सुरू केलेले सीएए विरोधातील आंदोलन 23 व्या दिवशीही सुरू ठेवले आहे. या आंदोलनात गृहिणीसह अनेक नोकरदार महिलाही सहभागी झाले असून, त्या महिलांकडून आंदोलन मागे घेण्याची मनस्थिती नसल्याचे पाहायला मिळत आहे.

बिहारमध्येही बंदला हिंसक वळण

पटना : सीएए, एनआरसीच्या विरोधात बुधवारी डाव्या पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. बिहारच्या काही जिल्हय़ात सकाळपासूनच बंदसाठी डाव्या पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करून घोषणाबाजी करत निदर्शने केली. बंद दरम्यान समर्थकांनी आंदोलकांवर दगडफेकही केली. सीतामडी-बेतियामध्ये समर्थक आणि विरोधकांच्या गटात झालेल्या हिंसाचारात आठ जण जखमी झाले आहेत.

Related Stories

लोकसभाध्यक्षांकडून विरोधी खासदारांची कानउघाडणी

Patil_p

कोरोनावरील भारतीय लस स्वातंत्र्य दिनी रुग्णसेवेत

Archana Banage

देशात 18,222 नवे बाधित, 228 मृत्यू

datta jadhav

भारताच्या साहाय्यासाठी अमेरिकेची धडक मोहीम

Patil_p

हिमाचल प्रदेशात 25 टक्के बस भाडे वाढविण्यास मंजुरी

Tousif Mujawar

आई-वडिलांसह चौघांची दारुच्या नशेत हत्या

Patil_p
error: Content is protected !!