Tarun Bharat

पश्चिम बंगाल : अधिकारी पिता पुत्रांना केंद्राकडून वाय + सुरक्षा

ऑनलाईन टीम / कोलकता

तृणमूल काँग्रेसमध्ये महत्वाची पदे भूषवलेले आणि भाजपमध्ये दाखल झालेले. भाजपा खासदार आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांचे वडील सिसिर अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वायसुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांची साथ सोडली होती.

नोव्हेंबर अखेरीस तृणमूल काँग्रेसला नारळ देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ज्याच्यामूळे तृणमूलमध्ये निर्माण झालेली मोठी पोकळी भरुन निघणार का याकडे बंगालच्या जनतेचं लक्ष लागून होतं. सुवेंदू अधिकारी यांच्याकडे परिवहन, जलसिंचन, जलस्त्रोत व विकास ही महत्त्वाची तीन खाती तसेच हलदिया विकास प्राधिकरणचे अध्यक्षपद होतं. त्यानंतर अधिकारी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही त्यांनी ममतांकडे सुपूर्द केला होता.

सुवेंदू हे महत्वाचे असल्याणे निवडणूकीपूर्वी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो असफल ठरला होता. सुवेंदू कुटुंबास ब्रिटीश कालीन राटवटीविरुद्ध लढण्याची पार्श्वभूमी असल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात चांगलेच परिचित आहेत. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहत पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध प्रचारास उतरत ममतांचा लढा आणखी तीव्र केला होता.

Related Stories

शिरढोण जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Archana Banage

अब्दुल लाटच्या कन्येची पॅरिस मधील भारतीय दूतावासमध्ये द्वितीय सचिवपदी नियुक्ती

Archana Banage

रणदीप गुलेरियांच्या सेवा कालावधीत वाढ

Amit Kulkarni

श्रेयवादावरुन शिंदे समर्थकांमध्ये राडा; लाठ्या-काठ्यांनी मारहाण

datta jadhav

दिलासादायक! महाराष्ट्रात एका दिवसात 1200 रुग्ण कोरोनामुक्त

Omkar B

विरोधकांचे 19 राज्यसभा खासदार निलंबित

Patil_p