Tarun Bharat

पश्चिम बंगाल : प्रचार व्हॅन तोडफोडप्रकरणी 5 अटकेत

ऑनलाईन टीम / कोलकाता : 

पश्चिम बंगालच्या स्वभूमीजवळील कडापारा येथे भाजपच्या प्रचार व्हॅनची तोडफोड आणि ड्रायव्हर, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी आज पाच आरोपींना अटक केली. 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक 8 टप्प्यात होणार असून, पहिला टप्पा 27 मार्चला पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असतानाच शनिवारी स्वभूमीजवळील कडापारा येथील एका गोदामात पार्क केलेल्या भाजपच्या प्रचार व्हॅनची तोडफोड करण्यात आली. तसेच ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. कोलकाता पोलिसांनी रविवारी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.

दरम्यान, भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांवर तोडफोड केल्याचा आणि गोदमातील मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप केला होता.

Related Stories

चीनविरोधात निर्वासित तिबेटी सक्रीय

Patil_p

नियतीच्या मनात होते की, बास्केटब्रिज व्हावा!

Archana Banage

महाराष्ट्रात 3,537 नवीन कोरोनाबाधित; 70 मृत्यू

Tousif Mujawar

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन मेजरसह ६ सैनिक ठार

Archana Banage

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा- धनंजय मुंडे

Archana Banage

प्रशांत किशोर अन् तृणमूल यांच्यात दुरावा

Patil_p