Tarun Bharat

पश्चिम भारतातील दुसरा ‘शीप ब्रेकींग प्रकल्प रत्नागिरीत

कॅप्टन दिलीप भाटकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश

जान्हवी पाटील/ रत्नागिरी

कॅप्टन दिलीप भाटकर म्हटले की, मरीन सिंडिकेट प्रा.लि. डोळय़ासमोर येते. देशातील पहिले फ्लोटींग डॉक सुरू करण्याचा मान यापूर्वीच यांनी मिळवला आहे. मात्र आता केंद्र शासनाने याठिकाणी शिप बेकींग प्रकल्पालादेखील परवानगी दिली असून या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे, मात्र हा शिप ब्रेकींग पश्चिम भारतातील दुसरा प्रकल्प ठरणार आहे. तर फ्लोटींग डॉक, शिप ब्ा्रsकींग आणि मालवाहतूक या तिन्ही सुविधा एकाच छताखाली उभे करणारे मरीन सिंडिकेट हे देशातील पहिले सेंटर ठरले आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे कोकणाचा चेहरामोहरा बदलणार असून हजारों युवकांना रोजगारही यामाध्यमातून मिळणार असल्याची माहिती कॅप्टन दिलीप भाटकर यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

मरीन क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती म्हणून कॅप्टन दिलीप भाटकर यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. ज्या मातीत लहानचे मोठे झालो, त्या मातीचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून गलेलठ्ठ पगाराची परदेशातील नोकरी सोडून कॅप्टन दिलीप भाटकर यांनी काही वर्षापूर्वी पुन्हा रत्नागिरी गाठले. याच जिल्हय़ात राहून आपण स्वत:चा एखादा प्रकल्प उभा करून स्थानिक युवकांना रोजगार द्यायचा असे स्वप्न मनाशी बाळगून सुरूवातील त्यांनी चौगुले पोर्ट मध्ये काम केले त्यानंतर मरीन सिंडिकेट नावाची स्वत:चे प्रकल्प सुरू केले. देशातील पहिले फ्लोटींग डॉक जयगड काताळे येथे सुरू केले त्यानंतर मालवाहतूकही याच माध्यमातून सुरू केली. याठिकाणी अनेक जहाजांची दुरूस्ती करून नव्याने बांधणी करून इतर सुविधा या तरंगत्या जहाज दुरूस्ती सेंटर मार्फत दिल्या जातात. याठिकाणी जगभरातील जहाजे येतात. यामाध्यमातून 120 कामगारांना रोजगारही मिळाला.

त्यानंतर आपण जहाज बांधणी करतो, दुरूस्त करतो मग जहाजाची कालमर्यादय़ा संपल्यावर त्याची तोडणी करणारी यंत्रणा आपल्याकडे असावी जेणेकरून आणखीन शेकडो तरूणांना जयगड, गुहागर, सैतवडे परिसरातील युवकांना रोजगार मिळेल कोकण सागरी किनाऱयांचा कायापालट होईल या हेतूने जहाज तोडणी (शिप बेकींग) साठी परवानगी मिळविण्यासाठी कॅप्टन दिलीप भाटकर यांनी प्रयत्न सुरू केले यासाठी त्यांना अनेक वर्षे अभ्यास करावा लागला, त्यानंतर परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यासाठी त्यांना काही वर्षे गेली आणि या सगळय़ा मेहनतीचे फळ म्हणून आज रत्नागिरीतील जयगड काताळे येथे पश्चिम भारतातील दुसरा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होत आहे. मुंबईत काही वर्षापूर्वी हा प्रकल्प होता मात्र काही कारणास्तव तो बंद पडला. सध्या गुजरात अलंग येथे भारतातील पहिले शिप बेकींग प्रकल्प आहे, याठिकाणी नुकतेच विराट जहाज तोडणीसाठी गेले आहे.

शिप बेकींग परवानगी अंतिम टप्प्यात असतानाच मुंबईतील ऑईल कंपन्यांचे तीन भव्य जहाज नुकतीच दाखल झालेली आहेत तर गुरूवारी गारनेट म्हणून आणखीन जहाज शिप ब्रेकींगसाठी दाखल झाली आहे, जहाजातील डिझेल विलगीकरण करण्यासाठी स्वतंत्र अशी टँकची निर्मिती करावी लागणार आहे त्यानंतर लगेचच शिप बेकींगचे काम सुरू होणार आहे.

कॅप्टन दिलीप भाटकर- प्रकल्प प्रमुख

इंडियन रजिस्टर ऑफ शिपींगकडून नुकतीच शिप बेकींग प्रकल्पाला मंजूरी मिळाली आहे. गेले अनेक वर्षे आपण यासाठी प्रयत्न करत होतो, आपल्या जिल्हयातील किनारपट्टींना यानिमित्ताने अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे. मोठा रोजगारही आपल्या तरूणांना मिळेल. आजगायत जेवढा कर्मचारी वर्ग प्रकल्पावर काम करत आहेत ते सर्व कामगार हे स्थानिक आहेत, आपण काहीतरी आपल्या मातृभूमीसाठी करतोय याचे समाधान या परवानगीनंतर मिळाले. त्यामुळे काताळे, सैतवडे, गुहागर या गावांना अधिक महत्व प्राप्त होणार आहे. 

Related Stories

सांबर शिंगांच्या तस्करी प्रकरणी रेडीतील दोघांना अटक

Patil_p

आचरा समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांच्या ७५ पिल्लांना सोडले

Anuja Kudatarkar

कासार्डेत उड्डाण पुलाच्या भिंतीला तडे

NIKHIL_N

ऐन लग्नसराईत ‘मण्णपुरम’चा दणका!

Archana Banage

चाहूल थंडीची ? तळकोकणही हळूहळू गारठतय !

Anuja Kudatarkar

वेंगुर्ल्यातील कामांवर प्रशासनाचे दुर्लक्ष!

NIKHIL_N