Tarun Bharat

पश्चिम महाराष्ट्र पूरस्थिती टाळण्यासाठी जयंत पाटील यांनी घेतली आढावा बैठक

पुणे \ ऑनलाईन टीम

पावसाळा तोंडावर आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील अ‍ॅलर्ट झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आज पूरस्थितीचा आढावा घेतला. यासंबंधीची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून कृष्णा-भिमा खोऱ्यातील भागात पूरचा त्रास जाणवत आहे. यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना पूराचा त्रास होऊ नये यासाठी पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे. सोबत त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

जयंत पाटील यांनी संभाव्य पूराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा घेतला. यासोबतच शेजारच्या राज्यांशीही चर्चाही सुरू आहे आणि पावसाळा सुरू होण्याआधीही बैठका घेतली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वासही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

Related Stories

पी. टी. उषा, इलैयाराजा राज्यसभेवर जाणार; पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली माहिती

Archana Banage

तपासातील पुरावे मिळणे अद्यापही बाकी : ऍड. विरेंद्र इचलकरंजीकर

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : विनामास्क फिरणार्‍यांवर कठोर कारवाई करा – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

Archana Banage

नाकात घुसलेले कोरोना विषाणू तयार करतात एक कोटी प्रतिकृती

datta jadhav

चिंता वाढली : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या पार

Tousif Mujawar

कोरोना लढ्यात अमेरिका देणार भारताला साथ

datta jadhav