Tarun Bharat

पहिले तरंगते हॉटेल बेवारस स्थितीत

Advertisements

उत्तर कोरियात सुरू झाला अंतिम प्रवास

ऑस्ट्रेलियात 33 वर्षांपूर्वी जगातील पहिले समुद्रात तरंगणारे पंचतारांकित हॉटेल फोर सीझन्स रीफ रिसॉर्ट तयार करण्यात आले होते. इटलीचे उद्योजक डॉन्ग टारका यांनी याची कल्पना केली होती. सद्यकालीन मूल्यानुसार याच्या निर्मितीवर सुमारे 753 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या हॉटेलमध्ये 176 खोल्या होत्या आणि यात 350 अतिथी राहू शकत होते. तसेच यात टेनिस कोर्ट देखील होते.

ऑस्ट्रेलियातील बॅरियर रीफ पाहण्यासाठी येणारे लोक या हॉटेलमध्ये वास्तव्य करतील असे टारका यांचे मानणे होते. पण हे हॉटेल काही वर्षेच चालू शकले. हे हॉटेल समुद्राच्या लाटांना झेलू शकत नव्हते. लाटांमुळे हे हॉटेल खूपच हलायचे. यामुळे पाहुण्यांना सी-सिकनेसचा आजार होऊ लागला. आता हे हॉटेल ऑस्ट्रेलियापासून 10 हजार मैल अंतरावर उत्तर कोरियात बेवारस स्थितीत आहे.

हत्येनंतर बंद झाले हॉटेल

हे हॉटेल 1998 मध्ये उत्तर कोरियाने खरेदी केले होते. हे हॉटेल माउंट कुमगँगनजीक समुद्रात उभे केले जाणार होते. तरीही विदेशी पर्यटकांनी उत्तर कोरियाकडे पाठ फिरविली होती. त्यानंतर एका दक्षिण कोरियन कंपनीने या हॉटेलची खरेदी केली, पण या तरंगत्या हॉटेलमध्ये हत्येच्या एका घटनेनंतर ते कायमस्वरुपी बंद झाले.

Related Stories

मेक्सिकोत कोरोनाने घेतले 1.71 लाख बळी

datta jadhav

…प्रसंगी सीपॅक रद्द करू

Patil_p

मोल्दोवामध्ये बॉम्बस्फोट, रशियासोबत युद्धाची भीती

Patil_p

अमेरिकेत नव्या नशेची महामारी

Patil_p

आयएस दहशतवाद्याचा न्यूझीलंडमध्ये चाकूहल्ला

Patil_p

क्युबाच्या राजधानीत विस्फोट, 22 ठार

Patil_p
error: Content is protected !!