Tarun Bharat

पहिले ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात

Advertisements

उशिराने सुरुवात, नेटवर्क अडचण, कोरोमुळे निर्णय : गेल्यावर्षीप्रमाणे तीस टक्के अभ्यासक्रम होणार कमी

प्रतिनिधी /पणजी

स्टेट कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग अर्थात एससीईआरटीने पहिली ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याचे ठरविले असून त्याचे परिपत्रक लवकरच जारी होणार आहे. कोरोना महामारीचे संकट अद्यापही चालू असल्याचे हा कपातीचा निर्णय घेण्यात आला असून नुकत्याच चालू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्ष-2021-22 मध्ये ही कपात लागू होणार आहे.

 मागील शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्येही अशीच अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. तोच अभ्यासक्रम यंदाही कापण्यात येणार आहे.

गोवा बोर्डाने यंदाही नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात केली होती. त्याच धर्तीवर एससीईआरटीने हा कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्याचे परिपत्रक अद्याप काढण्यात आलेले नाही. आता याच आठवडय़ात ते परिपत्रक काढून सर्व शाळांना पाठवण्यात येणार आहे.

अनेक कारणांमुळे केली कपात

शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होणे, ऑनलाईन शिकवणी व कोरोनाचे संकट या कारणांमुळे 30 टक्के अभ्यासक्रम कपात झाली आहे. त्याची माहिती लवकरच शाळांना देण्यात येणार असून शाळांनी ती ऑनलाईन माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अभ्यासमंडळाने केली होती शिफारस

एससीईआरटीच्या बोर्ड ऑफ स्टडीजने 30 टक्के अभ्यासक्रम कापण्याची सूचना केली होती व तशी लेखी शिफारस दिली होती तिची दखल घेवून हा कपातीचा निर्णय करण्यात आला आहे.

मागील शैक्षणिक वर्षात 2020-21 मध्ये 30 टक्के अभ्यासक्रम कापला तरी उर्वरित 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षाच झाल्या नाहीत. सर्व मुलांना पास करून पुढच्या वर्गात ढकलण्यात आले होते. त्यामुळे अभ्यासक्रम कपातीचा तसा काही उपयोग, फायदा-तोटा कोणालाच झालेला नाही. आता यंदाही 30 टक्के अभ्यासक्रम कापण्यात येणार असल्याने 70 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार की नाही हे आताच कळणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

आरोग्य कर्मचारी प्रचंड तणावाखाली

Patil_p

पिलारचे फा. आग्नेल स्कूल करणार दिल्लीत हॉकीमध्ये गोव्याचे प्रतिनिधीत्व

Amit Kulkarni

12 लाखाचे बक्षिस लागल्याचे सांगून ऑनलाईन फसविले

Patil_p

प्राथमिक विद्यार्थी अजून मोफत गणवेष, रेनकोटच्या प्रतीक्षेत

Amit Kulkarni

दृष्टीच्या संपकारी जीवरक्षकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Omkar B

मुरगाव पालिकेच्या अंदाज पत्रकावर येत्या 30 रोजी चर्चा, पालिका बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!