Tarun Bharat

पहिले रेल्वेगेट दुभाजकावर धोकादायक लोखंडी सळय़ा

पादचाऱयांना ये-जा करताना अडथळा : लोखंडी सळय़ांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

पहिले रेल्वे गेटजवळील दुभाजकावरील बॅरिकेड्स हटविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी लहान आकाराच्या खाबांची उभारणी करण्यात आली होती. मात्र सध्या सदर खांब खराब झाले असून लोखंडी सळय़ा बाहेर आल्याने पादचाऱयांना धोकादायक बनले आहेत. शहर स्मार्ट बनविण्यासाठी एक हजार कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण काही ठिकाणी नागरिकांना जीव धोक्मयात घालून पायपीट करावी लागत आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध योजना राबविण्यात येत असून रस्त्याचा विकास आणि नागरी सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पण काही ठिकाणी देखभाल केली जात नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. टिळकवाडी पहिले रेल्वे गेट परिसरातील बॅरिकेड्स हटविण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पादचाऱयांना ये-जा करणे अडचणीचे होत असल्याची तक्रार केल्यानंतर याठिकाणी केवळ पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी रस्ता निर्माण करून देण्यासाठी छोटे खांब घालण्यात आले आहेत. पण सदर खांब खराब झाले असून लोखंडी सळय़ा उघडय़ा झाल्या आहेत. परिणामी पादचाऱयांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे.

लोखंडी सळय़ांमुळेअपघात घडण्याची शक्यता

विशेषतः वृद्ध नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागते. रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूच्या वाहनांकडे लक्ष ठेवावे लागत आहे. अशातच लोखंडी सळय़ांची अडचण निर्माण झाली आहे. सदर लोखंडी सळय़ा कपडय़ांमध्ये अडकून नागरिक पडत आहेत. घाई-गडबडीत रस्ता ओलांडताना पडल्यास लोखंडी सळय़ांमुळे अपघात घडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सळय़ांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

बकरी मंडईत लाखेंची उलाढाल

Patil_p

शुद्ध पाणीपुरवठा करण्याकडे लक्ष द्या

Amit Kulkarni

निपाणीत सर्वधर्मियांकडून ‘एकतेचा दीप’

Patil_p

नागपंचमीच्या सणासाठी बाजारपेठ बहरली

Rohit Salunke

नववर्षारंभाच्या नावाखाली गैरप्रकार थांबवा

Omkar B

यमनापूरच्या शिवभक्तांची गडकोट संवर्धन मोहीम

Amit Kulkarni