Tarun Bharat

पहिल्याच दिवशी जिल्हय़ात 62 अर्ज दाखल

Advertisements

पहिल्या टप्प्यात 259 ग्रा.पं.ची होणार निवडणूक

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्हय़ातील ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कामकाजाला सुरूवात केली आहे. सोमवार दि. 7 पासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जिल्हय़ातील 259 ग्राम पंचायतींमध्ये 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकूण 4 हजार 259 सदस्य संख्या असून त्याची ही निवडणूक होत आहे.

अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस शुक्रवार दि. 11 रोजी असून पहिल्या दिवशीच मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांमध्ये आणखी अर्ज मोठय़ा प्रमाणात दाखल होणार आहेत. प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये हे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्या ठिकाणीच निवडणूक अधिकारी अर्ज देत आहेत तसेच अर्ज स्वीकारत आहेत. ग्राम पंचायतमध्ये अर्ज स्वीकारत असल्यामुळे उमेदवारांना अधिक धावपळ न करता त्या ठिकाणी अर्ज दाखल करुन सोपे जात आहे.

जिल्हय़ामध्ये एकूण 477 ग्राम पंचायतीमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात 259 ग्राम पंचायतींसाठी निवडणूक होत असून एकूण 4 हजार 259 सदस्य संख्या आहे. चार ग्राम पंचायतींना नगरपंचायतीच्या दर्जा मिळाल्यामुळे त्यांची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही सदस्य संख्या कमी झाली आहे.

बेळगाव जिल्हय़ातील पहिल्या टप्प्यात दि. 22 डिसेंबर रोजी बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी अशा सात तालुक्मयांतील एकूण 259 ग्राम पंचायतींच्या निवडणूका घेण्यात येणार आहेत. तर दुसऱया टप्प्यात म्हणजे दि. 27 डिसेंबर रोजी सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग, अशा एकूण 218 ग्राम पंचायतींसाठी मतदान होणार आहे.

काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्राम पंचायतीची निवडणूक कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढविता येणार नाही. त्यामुळे स्थानिक ग्राम विकास आघाडीवरच अवलंबून ही निवडणूक आहे. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली असून प्रत्येक उमेदवार आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Related Stories

आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी आरसीयू संघ रवाना

Amit Kulkarni

अतिवाड येथे पाण्याचे इंजिन चोरटय़ांनी लांबविले

Amit Kulkarni

राज्यात सोमवारी 14 नवे रुग्ण

Patil_p

रविवारी 601 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

हिमाचल प्रदेश राज्यपालांची‘लोकमान्य’ला भेट

Amit Kulkarni

जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!