Tarun Bharat

पहिल्याच दिवशी जोधपूर विमान फुल्ल!

प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद : स्टार एअरकडून विमानसेवा सुरू : बेळगाव-जोधपूर सव्वादोन तासांचा प्रवास

प्रतिनिधी / बेळगाव

संजय घोडावत ग्रुपच्या स्टार एअर कंपनीने मंगळवारपासून बेळगाव-जोधपूर या मार्गावर विमानफेरी सुरू केली. याचा उद्घाटन समारंभ थाटात करण्यात आला. विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते केक कापून उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला. उद्घाटनापूर्वीच पहिल्या दिवसाच्या विमानांची सर्व तिकिटे विक्री झाली.

स्टार एअरचे बेळगाव हे
ऑपरेशन हब झाले आहे. त्यामुळेच येथून अनेक शहरांना विमानसेवा देण्यात येत आहे. औद्योगिक, शैक्षणिक, व्यापारीदृष्टय़ा बेळगाव महत्त्वाचे असल्याने येथून सुरत, नाशिक, इंदूर, अहमदाबाद, जोधपूर व काही दिवसात स्टार एअर नागपूरला विमानसेवा देत आहे. बेळगाव-कोल्हापूर परिसरात अनेक राजस्थानी लोक असल्याने त्यांच्यासाठी ही विमानफेरी महत्त्वाची आहे. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमाला बेळगावमधील राजस्थानी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संजय घोडावत यांनी मानले आभार

उडान अंतर्गत देशातील शहरांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापूर्वीही सुरू केलेल्या फेऱयांना बेळगाव व कोल्हापूर येथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे अजमेरनंतर जोधपूरला विमानसेवा सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले. त्यांनी आपल्या या फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

बेळगावसोबतच कोल्हापूरच्या प्रवाशांचा समावेश पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून पहिल्यांदाच जोधपूरला विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. अवघ्या सव्वादोन तासांमध्ये जोधपूरला पोहोचता येत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी बेळगाव-जोधपूर व जोधपूर-बेळगाव या दोन्ही फेऱया दोन दिवस आधीच फुल्ल झाल्या होत्या. बेळगावसोबतच कोल्हापूर जिल्हय़ातील प्रवाशांनी पहिल्या दिवशी जोधपूरचा प्रवास केला. यावेळी 50 प्रवासी जोधपूरला गेले तर जोधपूरहून 50 प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

थकीत वेतन-काम देण्याची मागणी

Amit Kulkarni

कोविड-19 व डोळय़ांचे विकार

Patil_p

संभाजी महाराज मूर्तीचे शिवसेनेतर्फे पूजन

Amit Kulkarni

पाणीपुरवठा कामगारांनी घेतली आयुक्तांची भेट

Omkar B

मतदारयादीत नावे नोंदविण्यासाठी दोन दिवसांची मुदत

Amit Kulkarni

कार पुलावरून कोसळून प्राध्यापक ठार

Amit Kulkarni
error: Content is protected !!