Tarun Bharat

पहिल्या कसोटीत इंग्लंड विजयाच्या उंबरठय़ावर

वृत्तसंस्था/ गॅले

येथे सुरू असलेल्या यजमान लंकेविरूद्ध पहिल्या कसोटीत इंग्लंडचा संघ रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 74 धावांची जरूरी असून त्यांनी दुसऱया डावात 15 षटकांत 3 बाद 38 धावा जमविल्या होत्या. लंकेच्या दुसऱया डावात लाहिरु थिरिमनेने शतक तर कुशल परेरा (62) आणि मॅथ्यूज (71) यांनी अर्धशतके झळकविली.

या कसोटीत लंकेचा पहिला डाव 135 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 421 धावा जमवित 286 धावांची आघाडी घेतली. यजमान लंकेने दुसऱया डावात मात्र चिवट फलंदाजी केली. 2 बाद 156 या धावसंख्येवरून लंकेने चौथ्या दिवसांच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. थिरिमनेने 251 चेंडूत 12 चौकारांसह 111 तर मॅथ्यूजने 239 चेंडूत 4 चौकारांसह 71, कुशल परेराने 1 षटकार आणि पाच चौकारांसह 62, डिक्वेलाने 1 चौकारांसह 29, डी परेराने 5 चौकारांसह 24, कुशल मेंडीसने 1 चौकारांसह 15, कर्णधार चंडीमलने 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. इंग्लंड संघातील फिरकी गोलंदाज लिच सर्वात प्रभावी ठरला. त्याने 122 धावांत 5, बेसने 100 धावांत 3 आणि करनने 37 धावांत 2 बळी मिळविले. लंकेचा दुसरा डाव 136.5 षटकांत 359 धावांवर समाप्त झाला.

इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 74 धावांचे माफक उद्दिष्ट मिळाले असून त्यांनी 15 षटकांत 3 बाद 38 धावा जमविल्या आहेत. लंकेच्या इंबुलडेनियाने क्रॉले आणि सिबली यांना अनुक्रमे 8 आणि 2 धावावर बाद केले. कर्णधार रूट एका धावेवर धावचीत झाला. बेअरस्टो 11 तर लॉरेन्स 7 धावांवर खेळत आहे. इंग्लंडला विजयासाठी आणखी 36 धावांची जरूरी असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत.

संक्षिप्त धावफलक

लंका प. डाव सर्व बाद 135, इंग्लंड प. डाव सर्व बाद 421, लंका दु. डाव- 136.5 षटकांत सर्वबाद 359 (थिरिमने 111, मॅथ्यूज 71, कुशल परेरा 62, डिक्वेला 29, डी परेरा 24, चंडीमल 20, मेंडीस 15, डिसिल्वा 12, लिच 5-122, बेस 3-100, करन 2-37), इंग्लंड दु. डाव 15 षटकांत 3 बाद 38 (क्रॉले 8, सिबली 2, रूट 1, बेअरस्टो खेळत आहे 11, लॉरेन्स खेळत आहे 7, इंबुलडेनिया 2-13).

Related Stories

लंकेचा भेदक मारा, भारत 225

Amit Kulkarni

मेरी कोम, पूजा रानी, अनुपमा अंतिम फेरीत

Patil_p

नाओमी ओसाका तिसऱया फेरीतून बाहेर

Patil_p

हिदर नाईटवर शस्त्रक्रिया

Patil_p

वनडे मालिकेत अफगाणची विजयी सलामी

Patil_p

संयुक्त अरब अमिरातकडून मलेशिया पराभूत

Patil_p