Tarun Bharat

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 146 बसेस सेवेत

बेळगाव :/प्रतिनिधी

जिल्हय़ातील पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रकिया मंगळवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून निवडणूकीसाठी लागणारी सामुग्री निवडणूक अधिकाऱयांकडे सुपूर्द केली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी 146 तर पोलीस खात्याला 17 बसेस परिवहनने उपलब्ध करून दिल्या आहेत.

निवडणूकीसाठी 2500 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून यांना साहित्यासह मतदान केंद्रावर  पोहोचण्यासाठी 146 बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तर मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले असून पोलीसांच्या सेवेसाठी परिवहनने 17 बस उपलब्ध केल्या आहेत. जिल्हय़ात पहिल्या टप्प्यातील बेळगाव, बैलहोंगल, गोकाक, सौंदती, कित्तुर आदी तालुक्मयांसाठी बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

Related Stories

विद्यार्थ्यांच्या रास्ता रोकोमुळे एकच गोंधळ

Amit Kulkarni

सौर उर्जेद्वारे रेल्वेविभाग करणार विजनिर्मिती

Patil_p

दत्त जयंतीनिमित्त अनगोळ येथे विविध कार्यक्रम

Patil_p

रेल्वेच्या हुबळी विभागाला 1 कोटीचा महसूल

Patil_p

‘ऍक्सेस’कडे मोहन मोरे बीपीएल चषक

Amit Kulkarni

आझमनगर परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण नाही?

Patil_p