Tarun Bharat

पहिल्या दिवशी सेन्सेक्स 173 अंकांनी मजबूत

Advertisements

ऍक्सिस बँक चार टक्क्मयांनी नफ्यात : निफ्टी 11,322.50 वर बंद

वृत्तसंस्था/ मुंबई

मागील आठवडय़ातील शेअर बाजाराचा तीन दिवसांचा प्रवास घसरणीसोबत झाला आहे. मात्र चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशीच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 173 अंकांनी मजबूत कामगिरी करत 38,050.78 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसभरात वीज, धातू आणि वाहन कंपन्यांच्या समभागातील तेजीने बाजाराला सावरले असल्याची नोंद केली आहे.

प्रमुख कंपन्यांच्या समभागासोबत बँकिंगच्या समभागांनी घसरणीची परतफेड केली असून त्यांनी बाजाराला गती देण्याचा प्रयत्न केल्याचे पहावयास मिळाले आहे. सकाळी बाजार सुरु होताना 185 अंकांच्या तेजीसोबत झाला होता. परंतु दिवसभरातील व्यवहारानंतर सेन्सेक्समध्ये 386 अंकांवर चढ-उताराचे वातावरण निर्माण होत बंद झाले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 173.44 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,050.78 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 68.70 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 11,247.10 वर बंद झाला आहे.

दिवसभरात प्रामुख्याने एनटीपीसी, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, ओएनजीसी आणि मारुती सुझुकीचे समभाग तेजीत 7.92 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये स्टेट बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा आणि आयसीआयसीआय बँक तसेच एचडीएफसी बँक नुकसानीत राहिले आहेत.

आशियातील अन्य बाजारात जपानचा बाजार वगळता चीनचा शांघाय, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाचा बाजार तेजीत राहिला आहे. जपानच्या जीडीपी वृद्धीत एप्रिल ते जून तिमाहीत या अगोदरच्या तिमाहीच्या तुलनेत 7.8 टक्क्मयांनी घसरण झाल्याचे एका अहवालातून सांगितले आहे. दुसऱया बाजूला बेंट क्रूडचा भाव व्यवहाराच्या दरम्यान 0.40 टक्क्मयांच्या तेजीसह 45.15 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे. 

जगभरातील कोरोनाचा कहर वाढतो आहे अशीच स्थिती देशातील कोविड आकडेवारीची असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये एकाच दिवसात 57,981 नवीन रुग्ण वाढले आहेत. तसेच मृतांचा आकडा हा 50 हजारच्या घरात पोहोचला आहे. यामुळे जगभरातील तज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात असून याचा प्रभाव अप्रत्यक्षपणे देशातील शेअर बाजारावर पडताना दिसतो आहे.

Related Stories

सॅमसंग गॅलक्सी टॅब बाजारात

Omkar B

शेअर बाजाराने राखली तेजी कायम

Patil_p

डिसेंबर काळात 40 टक्के विदेशी गुंतवणूकीत वाढ

Patil_p

देशात होणार हजार ‘एलएनजी’ स्टेशन्स

Patil_p

चढउताराच्या सत्रात सेन्सेक्स तेजीत

Patil_p

11 वर्षामध्ये ब्रिटन प्रथमच आर्थिक मंदीमध्ये

Patil_p
error: Content is protected !!