Tarun Bharat

पहिल्या बिटकॉईन बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसन विजेता

वृत्तसंस्था / चेन्नई

एफटीएक्स पुरस्कृत जगातील पहिल्या बिटकॉईन क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद नार्वेचा ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसनने पटकाविले. या स्पर्धेतील झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात कार्लसनने अमेरिकेच्या वेस्ली सो याचा पराभव केला. इलाईट ऑनलाईनद्वारे सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धांमधील ही एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धा ही सर्वात अधिक बक्षीस रकमेची ठरली आहे. कार्लसनने या जेतेपदाबरोबरच 60 हजार डॉलर्सचे पहिले बक्षीस तसेच या स्पर्धेच्या पुरस्कर्त्याकडून ठेवण्यात आलेल्या 0.6 टक्के बोनसची रक्कमही पटकाविली.

ग्रॅण्डमास्टर कार्लसन आणि अमेरिकेचा वेस्ली सो यांच्यातील ही लढत शेवटपर्यंत चुरशीची झाली. या अंतिम लढतीत कार्लसनने रॅपिड विभागातील पहिल्या डावात सो चा पराभव करून आघाडी मिळविली. मात्र सो ने दुसरा डाव जिंकून बरोबरी साधली. उभयतामधील तिसरा डाव बरोबरीत राहिला. चौथा डाव बरोबरीत सोडविण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दोघांमध्ये ब्लिट्झ प्लेऑफ लढत खेळविण्यात आली आणि कार्लसनने पांढऱया मोहरांसह खेळताना सो चा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत रशियाच्या ग्रॅण्डमास्टर नेपोमनियाचीने तिसरे स्थान मिळविताना ग्रॅण्डमास्टर रॅडजाबोव्हचा 2.5-1.5 अशा गुणांनी पराभव केला. रशियन ग्रॅण्डमास्टरने 25 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळविले.

Related Stories

जलतरणात महाराष्ट्राला आणखी तीन सुवर्णपदके

Patil_p

लेजेंड्स बुद्धिबळ स्पर्धा आजपासून

Patil_p

रियल माद्रिदच्या कॅसेमिरोला मँचेस्टर युनायटेड करारबद्ध करणार

Patil_p

ऑस्ट्रेलियाचे पाकला चोख प्रत्युत्तर

Patil_p

कबड्डीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्याचे ध्येय

Patil_p

डल्लास टेनिस स्पर्धेत इबिंग विजेता

Patil_p