Tarun Bharat

पहिल्या रेल्वेगेटनजीकच्या दुभाजकाचा वाहनधारकांना फटका

नेहमी घाडताहेत आपघात : दुभाजकाला रंगरंगोटीसह रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी दुभाजक निर्माण करण्यात आले आहेत. काही ठिकाणी हे दुभाजक वाहनधारकांसाठी वरदान आहेत तर काही ठिकाणचे दुभाजक धोकादायक ठरत आहेत. पहिल्या रेल्वेगेटनजीक असलेले दुभाजक वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे या दुभाजकाला रंग देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पहिले रेल्वेगेट परिसरात रेल्वे ट्रक ओलांडताना वाहनधारकांची घाई सुरू असते. त्यामुळे प्रत्येक वाहनधारक पुढे जाण्यासाठी गेटसमोर जावून थांबतो. परिणामी वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. रेल्वेफाटक खुलताच जाण्यासाठी वाहनधारक तुटून पडतात. सर्वच बाजूंनी वाहने आल्याने वाहतूक कोंडी होते. तसेच देशमुख रोड, शुक्रवारपेठेतून येणारा रस्ता आणि साई मंदिराकडून येणारा रस्ता रेल्वेफाटकाजवळ येऊन मिळतात. परिणामी तिन्ही बाजूंनी वाहने येऊन थांबत असल्याने वाहनधारकांना अडचण निर्माण होते. यावर पर्याय म्हणून शुक्रवारपेठेत जाणाऱया रस्त्यावर रेल्वेफाटकालगत दुभाजक घालण्यात आला आहे. सदर दुभाजकावर चिखल माती उडाल्याने तसेच काही वाहनधारकांनी धडक दिल्याने दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना याची कल्पना येत नाही. रात्रीच्यावेळी रेल्वेफाटक ओलांडताना वाहनधारकांना सदर दुभाजक दिसत नाही. त्यामुळे नेहमी अपघात घडत आहेत.

बुधवारी रात्री 8 च्या सुमारास पावसामुळे सर्वत्र विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तसेच पथदीपदेखील बंद होते. अशा स्थितीत सदर दुभाजक वाहनचालकांच्या निदर्शनास आला नाही. परिणामी अपघात घडल्याने वाहनाचे आणि दुभाजकाचेही नुकसान झाले. सदर वाहन जागेवरच बंद पडल्याने वाहनचालकांना अन्य वाहनाचा आधार घेऊन दुरुस्तीसाठी नेण्याची वेळ आली. न दिसणाऱया दुभाजकाचा फटका चारचाकी आणि दुचाकी वाहनांना बसत असून दुभाजकाला रंगरंगोटी करण्यात यावी किंवा रात्रीच्या वेळी दिसणारा फ्लोरोसेंट रंग देण्यात यावा. तसेच रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

अपघातातील मृताच्या कुटुंबीयांना 35 लाख देण्याचे आदेश

Amit Kulkarni

रस्त्याला विरोध करण्यासाठी लढा सुरूच राहणार!

Amit Kulkarni

नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा यात्रोत्सव उत्साहात

Patil_p

किल्ला भाजी मार्केट गाळय़ांमध्ये अवैध व्यवसाय

Amit Kulkarni

प्रजासत्ताक दिनासाठी झेंडय़ांची विक्री

Patil_p

दोघा अट्टल आंतरराज्य घरफोडय़ांना अटक

Tousif Mujawar