Tarun Bharat

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचा आदमापुरात उत्साहात प्रारंभ

हजारो भाविकांचा सहभागाने ग्रंथदिंडी सोहळा संपन्न

सरवडे प्रतिनिधी

पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचा मान कोल्हापूरला मिळाल्याने जिल्ह्यातील तमाम वारकरी बांधवांनी सहभाग दर्शवून संमेलनाचा उत्साहात प्रारंभ केला. क्षेत्र आदमापूर येथे हजारो वारकर्‍यांच्या सहभागाने गावातील प्रमुख मार्गावरून टाळ-मृदंगाच्या गजरात व विठ्ठल नामाच्या जयघोषात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडी सोहळ्यास जिल्ह्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहिल्या विश्वात्मक साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी आदमापूर येथील मरगुबाई मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गावरून भजन व हरीनामाच्या जयघोषात ग्रंथदिंडी काढण्यात आली. हि दिंडी संत बाळुमामांच्या मंदिरात आल्यानंतर दिंडीची सांगता करण्यात आली.संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मदन गोसावी व डाॅ. रामचंद्र देखणे यांनी संत बाळूमामांच्या मुर्तीचे दर्शन घेतले.अध्यक्ष गोसावी व डाॅ देखणे यांचा देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

दीपप्रज्वलन संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथपूजन अध्यक्ष धैर्यशील भोसले व विणापूजन कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना न्यायमूर्ती गोसावी म्हणाले, विश्वशांतीसाठी संत साहित्य संमेलनांची गरज आहे. स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा वारकरी मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वागवेकर यांनी केले. आभार मानसिंग किल्लेदार यांनी मानले. रात्री रामचंद्र देखणे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. संमेलनाच्या पहिल्या दिवशी आदमापूर येथे वारकरी संप्रदायाची उपस्थिती लक्षणीय होती.

Related Stories

बृजभूषण यांच्या विरोधानंतर राज ठाकरेंसाठी कांचनगिरींचे पंतप्रधान मोदींना पत्र

Archana Banage

अवंतीपोरात ‘जैश’च्या टॉप कमांडरचा खात्मा

datta jadhav

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना जामीन मंजूर

datta jadhav

प्रियांका गांधींनी म्युकरमायकोसिस इजेक्शन कमतरेतवरून साधला मोदी सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

Archana Banage

हॉटेल ‘द ललित’मधील रहस्य रविवारी उघड करणार

datta jadhav

PFI कडून RSS च्या नेत्यांना धोका, केंद्राने दिली वाय दर्जाची सुरक्षा

datta jadhav