Tarun Bharat

पांढरवाडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लॉकडाऊनच्या काळात दारू विकणारे दोघे जेरबंद, दुकानाचा परवाना रद्द
सातारा / प्रतिनिधी

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंद असताना ही दारूची विक्री करत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. विभागाने पांढरवाडी(ता.माण)ये थील दारू विक्री करणाऱ्या दोघांना छापा टाकून अटक केली आहे.`संजय हरीचंद्र धमाळ, (वय 42 वर्षे रा. पांढऱवाडी ता. माण), महावीर मारुती पिसे (वय 50 वर्षे रा. माण) अशी त्यांची नावे असून त्या दोघांकडुन स्विफ्ट कारसह 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. दरम्यान, दुकानाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क सातारा विभाग सतर्क झाला आहे. राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनखाली निरीक्षक भरारी पथक सातारा व दुय्यम निरीक्षक कोरेगाव यांच्या संयुक्त पथकाने दि. 25 रोजी पांढरवाडी (ता. माण जि. सातारा) या ठिकाणी अवैध रित्या चालत असलेल्या दारू विक्रीवर मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला. त्याठिकाणी मारुती स्विफ्ट चार चाकी क्र. (MH -11- AK – 1661)या गाडीमध्ये 480 बॉटल्स देशी दारू व 48  बॉटल्स विदेशी दारू असा एकूण 2 लाख 10 हजार 720 रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

मुद्देमाल हॉटेल पूनम परमिट रूम व पिसे देशी दारू दुकान यामधून आणला असे सांगितले.त्याठिकाणी तपासणी केली असता हॉटेल पूनम व पिसे दारु दुकान याचे सिल तोडलेले निदर्शनास आले असून तपासणी केली असता मुद्देमालाची तफावत आढळून आली. संजय हरीचंद्र धमाळ, (वय 42 वर्षे रा. पांढऱवाडी ता. माण), महावीर मारुती पिसे (वय 50 वर्षे रा. माण) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरीक्षक महेश गायकवाड , जवान नितीन जाधव, सचिन खाडे, अजीत रसाळ, अजित घाडगे, आपासो काळे, किरण जंगम सहभागी झाले होते. जिल्हाअधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार दुकानाचा परवाना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

कारवाईबाबत माहिती घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 9822642642 या नंबरवर फोन केला असता ऑफिसला फोन करा अशा सल्ला दिला. अगोदरच या विभागात दारूच्या कारवाया कमी अन टक्केवारी ज्यादा. खिसे भरण्याची कामे लॉक डाऊनच्या काळात जोरात सुरू आहेत. माहिती देणाऱ्यास उलट फटफजिती या विभागाकडून केली जात असल्याने दारू दुकानदार अन विभागाचे अधिकारी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप सामाजिक होऊ लागला आहे.

Related Stories

सातारा येथील दोन रुग्णांचा सारीने मृत्यू

Archana Banage

केंद्रीय मंत्री दानवे यांनी राजीनामा द्यावा – ओबीसी संघटनेची निदर्शने

Abhijeet Khandekar

आयशर टेम्पोच्या धडकेत महामार्ग पोलीस नाईक सागर चोबे यांचा मृत्यू

Archana Banage

मोळाचाओढा रस्त्यावरील अरुंद पुल देतोय अपघातांना निमंत्रण

Patil_p

सत्ताधाऱयांकडून फेरीवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

Patil_p

शाहूपुरी पाणी योजनेसाठी आमदार शिवेंद्रराजेंना साकडे

Omkar B
error: Content is protected !!