Tarun Bharat

पाईपलाईन रस्ता अडकला हद्दीच्या वादात

रस्त्याची दुरुस्ती त्वरित न केल्यास आंदोलन

वार्ताहर /हिंडलगा

हिंडलगा ग्राम पंचायत आणि महापालिकेच्या हद्दीला लागून असलेल्या विजयनगर येथून गणेशपूरला जोडणाऱया पाईपलाईन रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दुर्दशा झाली आहे. याच परिसरातील रहिवासी व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी ग्राम पंचायत, महापालिकेच्या अधिकाऱयांनी पाहणी करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून सदर रस्त्याच्या डांबरीकरणाकडे ग्राम पंचायत व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. रस्ता पंचायत आणि महापालिकेच्या हद्दीला लागून गेला आहे. त्यामुळे हद्दीच्या वादात रस्ता अडकला आहे. त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्ता हिंडलग्यापासून गणेशपूरला जाण्यासाठी जवळचा असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. परिणामी पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रार करूनही ग्राम पंचायत व महापालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रहिवासी व वाहनधारकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नागेश माने व रहिवाशांनी दिला आहे.

Related Stories

भाडे थकविणाऱ्यांना सूट, नियमित घरपट्टी भरणाऱ्यांना भुर्दंड

Patil_p

बेळगाव-गोवा वाहतूक पुन्हा आठ तास ठप्प

Patil_p

पडक्या घरात झोपेत असतानाच इसमाचा मृत्यू उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर

Omkar B

शेतकऱयांची जीवनदायिनी मुंगेत्री नदीचे अस्तित्व धोक्यात

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 270 कोरोना बाधितांची नोंद

Tousif Mujawar

जे सुंदर ते अधिक सुंदर करण्याची किमया चित्रकार करतो!

Amit Kulkarni