Tarun Bharat

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग

राजौरी

 जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या राजौरी सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या लष्कराने गोळीबार करून शस्त्रसंधीचा भंग केला आहे. भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले असून पाकिस्ताचे नुकसान केल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी पहाटे अचानक पाकिस्तानी लष्कराच्या एका तुकडीने सीमेवरील भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. नागरीकांची काही घरे आणि या भागातील मशिदीही सुटल्या नाहीत. राजौरीप्रमाणेच नौशेरा विभागातही भारताने चोख प्रत्युत्तर दिले. 2020 मध्ये पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवर 5 हजार 100 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. हा गेल्या 18 वर्षांमधला उच्चांक आहे. पाकच्या गोळीबारात गेल्या वर्षात 12 नागरीकांच्या प्राण गमवावे लागले. 24 सैनिक हुतात्मा झाले आहेत.

Related Stories

हिंसाचारावर नाराजी, कृषी कायद्यांचे कौतुक

Patil_p

दिल्लीत 96 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Tousif Mujawar

मथुरा- वृंदावनमधील हॉटेलमध्ये चिनी नागरिकांना राहण्यास बंदी

Tousif Mujawar

पेट्रोल-डिझेलच्या दरात सातव्या दिवशीही वाढ

Patil_p

शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू ची राज्यात चर्चा …    

Kalyani Amanagi

मूडीजकडून भारताच्या पतमानांकनात घट

Patil_p