Tarun Bharat

पाककडून विंडीजला 329 धावांचे आव्हान

Advertisements

वृत्तसंस्था/ किंग्जस्टन

दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पाकने यजमान विंडीजला निर्णायक विजयासाठी 329 धावांचे आव्हान दिले. शाहीन आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा पहिला डाव 150 धावांत आटोपला. शाहीन आफ्रिदीने 51 धावांत 6 गडी बाद केले.

या कसोटी सामन्यात पाकने पहिला डाव 9 बाद 302 धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजचा पहिला डाव 51.3 षटकांत 150 धावांत आटोपला. विंडीजतर्फे बॉनेरने 37, ब्लॅकवूडने 33, होल्डरने 26 आणि चेसने 10 धावा जमविल्या. विंडीजच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकतर्फे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 6 बळी मिळविले. मोहम्मद अब्बासने 3 तर अश्रफने 1 गडी बाद केला.

152 धावांची आघाडी घेतल्यानंतर पाकने आपला दुसरा डाव 6 बाद 176 धावांवर घोषित करत विंडीजला निर्णायक विजयासाठी 329 धावांचे आव्हान दिले. विंडीजने चौथ्या दिवशीअखेर दुसऱया डावात 19 षटकांत 1 बाद 49 धावा जमविल्या. खेळाच्या शेवटच्या दिवशी विंडीजला विजयासाठी आणखी 280 धावांची जरूरी असून त्यांचे 9 गडी खेळावयाचे आहेत. पाकच्या दुसऱया डावामध्ये इम्रान बट्टने 44 चेंडूत 37, अबीद अलीने 23 चेंडूत 29, अझहर अलीने 30 चेंडूत 22, कर्णधार बाबर आझमने 41 चेंडूत 33, हसन अलीने 17 तसेच अश्रफने 9 आणि रिझवानने नाबाद 10 धावा जमविल्या. विंडीजतर्फे होल्डर आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 2 तर मेयर्स आणि ब्रेथवेट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.  शेवटच्या सत्रातील दीडतास बाकी असताना पाकने आपल्या दुसऱया डावाची घोषणा केली. त्यानंतर विंडीजने दिवसअखेर 19 षटकांत 1 बाद 49 धावा जमविल्या. सलामीचा पॉवेल 23 धावांवर धावचीत झाला. ब्रेथवेट 17 तर जोसेफ 8 धावांवर खेळत होते. या मालिकेतील पहिली कसोटी विंडीजने जिंकून आघाडी मिळविली असून पाकला ही शेवटची कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडण्याची संधी लाभली आहे.

संक्षिप्त धावफलक ः पाक प. डाव 9 बाद 302 डाव घोषित, विंडीज प. डाव 51.3 षटकांत सर्वबाद 150 (बॉनेर 37, चेस 10, ब्लॅकवूड 33, होल्डर 26, शाहीन आफ्रिदी 6-51, मोहम्मद अब्बास 3-44, अश्रफ 1-14 ), पाक दु. डाव 27.2 षटकांत 6 बाद 176 डाव घोषित (इम्रान बट्ट 37, अबीद अली 29, अझहर अली 22, बाबर आझम 33, हसन अली 17, रिझवान नाबाद 10, होल्डर 2-27, जोसेफ 2-24, मेयर्स 1-43, ब्रेथवेट 1-28), विंडीज दु. डाव 19 षटकांत 1 बाद 49 (ब्ा्रsथवेट खेळत आहे 17, जोसेफ खेळत आहे. 8, पॉवेल 23).

Related Stories

विदेशातील प्रोटोकॉल तोडू नका- रिजिजू

Patil_p

सेरेनाकडून व्हिनस पराभूत

Patil_p

भारताविरुद्ध जिंकला एल्गारचा करारी बाणा!

Amit Kulkarni

भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय

Amit Kulkarni

गगन नारंग-अनु राज सिंग लवकरच विवाहबद्ध

Patil_p

आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताला 34 पदके

Amit Kulkarni
error: Content is protected !!